MH 13 NEWS NETWORK
आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने महाशिवरात्री दिनानिमित्त बाळीवेस हनुमान मंदिर शेजारी गोर,गरिब, वंचित, बेघर निराधार,अनाथ यांना शाबुदाना खिचडी, शेंगा लाडू, केळी, वेफर्स, ताक इत्यादी फराळीच वाटप नगरसेवक विनायक विटकर, आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी, सल्लागार हर्षलभाई कोठारी, संचालक देविदास चेळेकर प्रसिद्ध प्रमुख सुहास छंचुरे गणेश कोरे, अशोक कामटे विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष योगेश कुंदुर वेंदात तालिकोटी, राजू पाथरुटकर, नितीन भांडेकर, शशिकांत चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.

आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सोलापुरात कुठेही, कधीही उपाशी राहू नये भुकेलेल्याला अन्न देणे आणि भगवंताच्या नामाचे स्मरण करणे या दोन्ही गोष्टींचा विचार करून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजच आपण काहीतरी तरी देणे लागतो उद्देशाने फराळाचे वाटप करण्यात आले अन्न दानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही हे नित्य वाढतच असते.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिंटू कस्तुरे, महेश नागणसुरे,सुरज छंचुरे,उदय छंचुरे, अनिल कपाळे, योगीराज आरळीमार प्रथमेश गावडे यांनी परिश्रम घेतले