Sunday, June 29, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मशिदीतील खुनीहल्ल्यातील शिक्षा झालेल्या १७ आरोपींना उच्च न्यायालयात..

MH13 News by MH13 News
25 March 2024
in गुन्हेगारी जगात, महाराष्ट्र
0
0
SHARES
205
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


मशिदीच्या विश्वस्तांचा वाद आपापसात मिटविण्यासाठी शहर काझींनी मशिदीत बोलावलेल्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप होऊन त्यातून पाचजणांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा झालेल्या १७ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात जामीन मंजूर केला.
  या प्रकरणाची हकीकत अशी की, साखर पेठ-बुधवार बाजारात इकरारअली मशिदीत १ डिसेंबर २०१५ रोजी बैठकीत सशस्त्र हल्ल्याचा प्रकार घडला होता. या  मशिदीच्या विश्वस्तांमध्ये वाद प्रलंबित होता. हा वाद मिटविण्यासाठी मशिदीत शहर काझी अहमदअली सय्यद यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. आरोपी हे विश्वस्त नसताना मागील वर्षांपासून वर्गणी गोळा करतात, मशिदीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करून तेथे भाडेकरू ठेवतात, त्याचा हिशेब कधीही देत नाहीत, असा आरोप जैनोद्दीन शेख व इतरांनी केला असता संतापलेल्या आरोपींनी, तुम्ही हिशेब मागणारे कोण, असे विचारत  जैनोद्दीन शेख व इतरांवर दगड-विटांसह सळईने हल्ला केला. ही मारहाण थांबविण्यासाठी धावून आलेल्या जैनोद्दीनची वृध्द आई मुमताज यांनाही मारहाण केली. याप्रकरणी जैनोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
  या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी गेल्या ७ फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींना खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा. द. वि. कलम ३०७ अन्वये दोषी धरून प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली होती. रियाज ऊर्फ गियासोद्दीन अहमदसाहब रंगरेज, मतीन मुर्तूज नालबंद, अल्ताफ रफियोद्दीन वलमपल्ली, दाऊद अब्बास नालबंद, खलील ख्वाजादाऊद नालबंद , ए रजाक मेहबूबसाहेब मंगलगिरी , म. गौस खाजादाऊद नालबंद, जुबेर मेहमूद नालबंद, हरून रफीउद्दीन वल्लमपल्ली, म. कासीम म. शरीफ नालबंद, मैनोद्दीन म. शरीफ नालबंद,  मेहमूद म. युसूफ नालबंद, फारूख अ. रजाक मंगलगिरी, हसन ऊर्फ सैफ अ. रजाक मंगलगिरी, आरीफ जिलानी नालबंद, इलियास अ. रजाक  मुतवल्ली, सर्फराज म. शरीफ नालबंद (सर्व रा. शनिवार पेठ, सोलापूर) या आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात पाठविण्यात आले होते. परंतु या  शिक्षेविरुध्द सर्व आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलातील प्राथमिक सुनावणी न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर झाली. आपिलातील जामीन अर्जावरील सुनावणीप्रसंगी आरोपींचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये, खून  करण्याचा आरोपींचा उद्देश नव्हता, बैठक संपल्यानंतर उशिरा वादातून सदरचा प्रकार घडलेला आहे, आरोपींविरुध्द खुनीहल्ल्याचा आरोप सिध्द होऊ शकत नाही, असा मुद्दा हा मुद्दा न्यायमूर्तींनी मान्य केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी १७ आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी उच्च न्यायालयात सर्व आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने व ॲड. पी. एम.   ढालायत यांनी तर सरकारतर्फे ॲड. पी. पी. देवकर यांनी काम पाहिले.

Tags: high court
Previous Post

माजी नगरसेवक सुभाष (मामा)डांगे यांना पुत्रशोक ; बंटीचा नदीत बुडून मृत्यू

Next Post

ढोल ताशांच्या गजरात भाजपा उमेदवार राम सातपुतेंचे स्वागत ; Road Show for Campaign

Related Posts

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन
धार्मिक

इंट्याक सोलापूरतर्फे संस्मरणीय ‘इंद्रभुवन वारसा फेरीचे’आयोजन

29 June 2025
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..
मनोरंजन

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

28 June 2025
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!
आरोग्य

डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात मोठी कलाटणी! मनीषा माने मुसळे यांना जामीन मंजूर; सुसाईड नोट..!

25 June 2025
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
मनोरंजन

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

24 June 2025
चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन
गुन्हेगारी जगात

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

17 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
Next Post

ढोल ताशांच्या गजरात भाजपा उमेदवार राम सातपुतेंचे स्वागत ; Road Show for Campaign

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.