MH 13News Network
शहरातील माजी नगरसेवक सुभाष उर्फ मामा डांगे यांचे थोरले चिरंजीव यशवंत उर्फ बंटी सुभाष डांगे ,वय वर्ष 42 यांचा उज्जैन येथील धामनोद येथे नर्मदा नदीत पोहायला गेले असताना आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला.आज सोमवारी रात्री सोलापुरात त्यांच्या निवासस्थानी मृतदेह आणला जाणार आहे.
यशवंत हे छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी कंपनीत उच्च अधिकार पदावर कार्यरत होते.होळीच्या सुट्टीमध्ये महाकालेश्वर यांच्या दर्शनासाठी ते आणि त्यांचे तीन मित्र गेले होते.उज्जैन येथील महाकालेश्वर भस्म आरती मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांच्यासोबत इतर तीन मित्र गेले होते. नर्मदा नदीत अंघोळ करताना खलघाट येथील भागात त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मासेमारी करणाऱ्या काही जणांनी त्यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढून धामनोद येथे शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.
यशवंत हे आपल्या तीन मित्रासोबत होळीची सुट्टी घालवण्याकरता उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरती मध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. डांगे यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली असून मृतदेह सोलापुरात अंत्यसंस्कारासाठी आणला जात आहे. साधारण साडेआठ पर्यंत मृतदेह सोलापुरातील बाळे येथील डांगे यांच्या निवासस्थानी आणला जाईल. त्यानंतर नऊ वाजता बाळे येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
यशवंत उर्फ बंटी डांगे हे माजी नगरसेवक सुभाष डांगे यांचे थोरले पुत्र असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, एक भाऊ काका -काकू असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या अकाली निधनाने परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.