MH 13News Network
मराठा आरक्षणाचा लढा अद्यापही सुरू असून शासनाने दिलेल्या 10 टक्के आरक्षणास जरांगे पाटील यांनी विरोध केला असून आरक्षण चळवळ लोकसभा निवडणुकीत वेगळाच पॅटर्न राबवत आहे. या आधी प्रत्येक गावातून दोन उमेदवार उभे केले जाणार असल्याचे सांगण्यात आलं,परंतु 24 मार्चच्या अंतरवाली सराटीतील बैठकीनंतर एकास एक अपक्ष उमेदवार उभे करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांत अस्थिरता निर्माण झाली आहे.तळागाळातील उमेदवाराची राजकीय Entry जरांगे पाटलांमुळे होणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.
माढा लोकसभा मतदार संघातील फलटण, माण ,माळशिरस, सांगोला ,करमाळा ,माढा या सर्व तालुक्यातील व या लोकसभा मतदार संघांत येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांची आज गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी दुपारी अक्षता मंगल कार्यालय माळशिरस या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रस्थापित विरोधात गरजवंत मराठ्यांच्या लढ्यात तळागाळातील उमेदवाराला राजकीय व्यासपीठ मिळवून देणारा एक पॅटर्न निर्माण होत आहे.
अशी आहे आचारसंहिता..
लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराने समाजाविषयी केलेले योगदान, मराठा आरक्षण आंदोलनातील सहभाग, सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमी, महत्त्वाचे म्हणजे राजकीय कोणत्याही पक्षाचा सभासद नसणे आणि जर असेल तर त्या पदाचा राजीनामा देऊन बैठकीत सहभागी होणे, गुन्हेगारी पार्श्वभूमी याची सविस्तर माहिती..
का सुरू आहेत विचार विनिमय बैठका..!
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटी या ठिकाणी 24 मार्च रोजी बैठकीत सूचना दिलेल्या होत्या.त्यात मराठा समाजातील तसेच इतर समाजातील भावना जशी आहे तशी लेखी स्वरूपात लिहून घेत आहे. लेखी स्वरूपात हीच माहिती मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 30 मार्च पर्यंत दिली जाणार आहे. त्यानुसार समाज बांधव अनेक ठिकाणी विचार विनिमय बैठका घेत आहेत.सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव असून त्याची बैठक उद्या शुक्रवारी शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे.
विचार विनिमय बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद..
साधारण दोन ते अडीच हजारांच्या संख्येने या ठिकाणी मराठा समाज तसेच इतर बहुजन समाजातील समाज बांधव विचार विनिमय महाबैठकीसाठी उपस्थित आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आपली मते मांडण्यासाठी विचार विनिमय बैठकीत वेळ देण्यात आलेला आहे.यात फलटण, माण ,माळशिरस, सांगोला ,करमाळा ,माढा लोकसभा निवडणुकीत इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपापली मते नोंदवत आहे..
पुढील बातमी अपडेट याच ठिकाणी..