MH 13 NEWS NETWORK
जैनधर्म हा एक भारतातील प्राचीन धर्म आहे. अहिंसा,सत्य व तपस्या यावर आधारित आहे. जैन धर्माचे संस्थापक भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरात भव्य अशी मिरवणूक शोभयात्रा काढण्यात आली होती.
या मिरवणुकीत भगवान महावीर यांच्या प्रतिमेस माजी नगरसेवक विनायक विटकर आणि शहिद अशोक कामटे विचारमंच अध्यक्ष योगेश कुंदूर यांनी श्रीफळ अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद तालिकोटी,वेदांत तालिकोटी,पिंटू कस्तुरे आदी मान्यवर उपस्थित होते