Monday, October 13, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘आस्था’चा उपक्रम.!रुग्णांसाठी आमरस-पुरणपोळी भोजन, महिला कुष्ठरुग्णांसाठी कीर्तन व स्नेहभोजन

MH13 News by MH13 News
5 months ago
in सोलापूर शहर
0
‘आस्था’चा उपक्रम.!रुग्णांसाठी आमरस-पुरणपोळी भोजन, महिला कुष्ठरुग्णांसाठी कीर्तन व स्नेहभोजन
0
SHARES
146
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS Network

सोलापूर | प्रतिनिधी

सोलापुरातील आस्था रोटी बँकेने अक्षय तृतीयानिमित्त, तसेच भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती या पावन दिवशी, माणुसकीची सुवास पसरवणारे भावनिक आणि सेवाभावी उपक्रम राबवले.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या पूजनास रामचंद्र तडवळकर, डॉ. जानवी माखीजा व लक्ष्मीकांत बिराजदार या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली.

यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) रुग्णांच्या नातेवाईकांसाठी खास आमरस व पुरणपोळीच्या मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले. रुग्णांच्या तणावग्रस्त चेहऱ्यांवर समाधानाचा हास्यफुलारा फुलला.

“सणाच्या दिवशी घरापासून दूर असूनही, इथे घरचीच ऊब मिळाली,” अशा भावनिक प्रतिक्रिया काही नातेवाईकांनी दिल्या.

या नंतर, कुमठा नाका येथील भारतमाता नगरीत राहणाऱ्या महिला कुष्ठरोगींना कीर्तनाचा अनुभव देण्यासाठी खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

ह. भ. प. अरुंधती महाराज भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जीवनातील साध्या उदाहरणांनी स्फूर्तिदायक कीर्तन सादर केले. कीर्तनानंतर महिलांना स्नेहपूर्वक मिष्टान्न भोजनही देण्यात आले.यापैकी अनेक महिलांनी याआधी टीव्हीवरच कीर्तन पाहिले होते,

परंतु प्रत्यक्ष कीर्तन अनुभवण्याची इच्छा आज प्रत्यक्षात उतरली. “मंदिरात जाऊन कीर्तन ऐकण्याची इच्छा असूनही शारीरिक व्यंगांमुळे शक्य नव्हते, परंतु आज आमच्यासाठी मंदिरच इथे आलं,” अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.

या सर्व उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित, एकाकी आणि उपेक्षित घटकांपर्यंत प्रेम, आपुलकी आणि आस्था पोहचविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विजय छंचुरे, तसेच नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संपदा जोशी, अनिता तालीकोटी, राधा मॅडम, मंगल पांढरे, अविनाश मार्चला यांनी महत्त्वाचे योगदान दिले.सूत्रसंचालन छाया गंगणे, तर आभार प्रदर्शन स्नेहा वनकुद्रे यांनी केले.

Tags: Aastha roti bankCivil hospitalsolapurSolapur Maharashtra
Previous Post

इंदापूरजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, दोन महिलांसह एक मुलगी जखमी..

Next Post

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार..!

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur
गुन्हेगारी जगात

‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur

7 October 2025
Next Post
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार..!

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार..!

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.