Mh13news Network
बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; दुपारी १ वाजता ऑनलाईन पाहता येणार
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, म्हणजेच सोमवार, ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी
:mahresult.nic.
inhscresult.
mkcl.orgmsbshse.co.in
निकाल पाहताना विद्यार्थ्यांना आपला परीक्षा क्रमांक (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) आवश्यक असेल. त्यामुळे ही माहिती हाताशी ठेवावी, असे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.

यंदाच्या परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. निकालानंतर गुणपत्रक शाळा/महाविद्यालयांमार्फत काही दिवसांत वितरित करण्यात येईल.निकालाबाबत काही अडचण आल्यास विद्यार्थी आपल्या शाळेशी किंवा मंडळाच्या अधिकृत हेल्पलाइनशी संपर्क साधू शकतात.
