Saturday, June 27, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Solapur| माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..

MH13 News by MH13 News
1 year ago
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
Solapur|  माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..
0
SHARES
973
VIEWS
ShareShareShare

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

सोलापूर, २५ जून:शहरातील माजी महापौर आणि शिवपार्वती लॉजचे मालक मनोहर सपाटे यांच्याविरोधात एका महिलेनं लैंगिक छळासंदर्भात गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीनंतर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 (लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न), 75 (विनयभंग), आणि 78 (दमदाटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेनं ॲड. योगेश पवार यांच्या कायदेशीर सल्ल्याने स्वतः स्टिंग ऑपरेशन करून आरोपीच्या कथित कृत्याचे व्हिडीओ स्वरूपातील पुरावे गोळा केले. हे प्रकरण २४ जून रोजी संध्याकाळी लॉजमधील एका खोलीत घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, व्हिडीओ कोणतीही छेडछाड न करता अधिकाऱ्यांच्या समोर सादर करण्यात आला असून, तो अत्यंत संवेदनशील स्वरूपाचा असल्यामुळे सार्वजनिक करण्यात आलेला नाही. पोलिसांनी तपासासाठी तो जप्त केला आहे.

ॲड. पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, पीडितेच्या संमतीनेच स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं असून, यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नसून फक्त न्याय मिळवण्याचा उद्देश होता.दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीनंतर पुढील कायदेशीर कारवाईचा संकेत पोलिसांनी दिला आहे. तसेच, या संदर्भात अन्य कोणीही पीडित असल्यास त्यांनी पोलिसांकडे अथवा महिला आयोगाकडे पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन ॲड. पवार यांनी केलं आहे.

यापूर्वी सुद्धा सपाटे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल..!

यापूर्वी सुद्धा एका शिक्षिकेने सपाटे यांनी गैरफायदा घेऊन सतत लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद फौजदार चावडी पोलिसांमध्ये दाखल केली होती. परंतु पोलिसांनी त्या प्रकरणात तपास पूर्ण करून पुरावा मिळून येत नसल्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला होता याबाबत न्यायालयात हरकत नोंदवून पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाने सपाटे विरुद्ध पुन्हा तपास करण्याचा आदेश पोलिसांना दिले होते. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. अशी माहिती मूळ फिर्यादीचे वकील संतोष नाव्हकर यांनी दिली आहे.

📝 टीप:ही बातमी जनहित आणि कायदेशीर जाणीवसंपन्नता वाढवण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध करण्यात येत आहे. संबंधित आरोप सिद्ध झालेले नसून, अंतिम निर्णय न्यायालयीन प्रक्रियेनंतरच होईल.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

राजवीरचा दमदार परफॉर्मन्स; विहान क्रिकेट क्लबची विजयी घोडदौड..!

Next Post

‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

Related Posts

शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
Next Post
‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

'कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन; मनोरंजन विश्वाला मोठा धक्का..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.