१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
भाजप नेते अनंत जाधव यांच्या पुढाकारातून चार लाभार्थ्यांना १५ लाखांचे धनादेश सुपूर्द करणार..
सोलापूर : प्रतिनिधीप्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी दहिटणे आणि शेळगी येथे उभारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पांच्या पहिल्या टप्प्यातील १३४८ लाभार्थ्यांना सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार, १७ ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, पुणे मंडळाचे माजी सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातील तब्बल १ लाख ५० हजार लाभार्थ्यांना उद्योग-व्यवसायासाठी आर्थिक लाभ मिळाला असून, या योगदानाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. हा सत्कार भाजप नेते अनंत जाधव, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव, किरण पवार आदींच्या वतीने होणार आहे.
यावेळी अनंत जाधव यांच्या पुढाकारातून चार लाभार्थी –
मोरे प्रभाकर प्रल्हाद (श्री समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स),
चटके संगीता धर्मराज (श्री गुरु डेअरी फार्म),कोडक हेमलता संजय (ए. के. मसाले),
मोटे शरद किसन (श्री गणेश ऑटो स्टोअर्स),यांना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात दोन मराठा भगिनी मुख्यमंत्री फडणवीस यांना आपले बंधू मानून राखी बांधणार आहेत.मराठा बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत जाधव, राम जाधव व किरण पवार यांनी केले आहे.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Vijay Deshmukh