📍 मुंबई | प्रतिनिधी /महेश हणमे
राज्यातील मराठ्यांसाठी सगळ्यात मोठी बातमी..!
मराठे लढाईतही जिंकले आणि तहातही..!
गुलाल उधळूनच मराठे मुंबई बाहेर पडणार..!
मराठा समाजाच्या दीर्घ संघर्षाला आज ऐतिहासिक यश मिळालं आहे.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाचा शेवट जल्लोषात होणार असून, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लढाईत आणि तहातही विजय मिळवला आहे.

सरकारचे महत्त्वाचे निर्णय
हैदराबाद गॅझेटची तात्काळ अंमलबजावणी
सातारा गॅझेटचा अभ्यास करून एका महिन्यात अंमलबजावणी
तातडीने जीआर काढण्याचा शासनाचा शब्द
औंध संस्थानासंदर्भातील निर्णय..
सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचा शासन निर्णय
मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबियांना एका आठवड्यात आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा..
मराठा–कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय दोन महिन्यांत होणार,
यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे मनोज जरांगे पाटलांना आश्वासन
मुंबईतील आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या आंदोलकांनी निर्णयांनंतर जल्लोष केला आहे.
गुलाल उधळूनच जरांगे पाटील परतीचा मार्ग धरतील.जरांगे पाटील यांनी स्पष्ट संदेश दिला
“जीआर आल्यानंतरच आम्ही संपूर्ण मुंबई रिकामी करू, गुलाल उधळल्याशिवाय परत जाणार नाही.”
“सरकारच्या या निर्णयानंतर रात्री नऊपर्यंत मुंबई रिकामी करून आंदोलक गावी परतणार आहेत.
मराठा समाजाच्या संघर्षात बलिदान दिलेल्या बांधवांना शासनाने दिलेला सन्मान, भविष्यातील आरक्षणाची हमी आणि मराठा-कुणबी एकच असल्याचा निर्णय या सर्वामुळे हा दिवस मराठा समाजाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणार आहे.








