महेश हणमे /प्रतिनिधी
मराठ्यांचा ऐतिहासिक विजय..! हैदराबाद गॅझेटचा जीआर जारी..!
मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर येऊन आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सरकारने पाटलांच्या महत्त्वपूर्ण मागण्या मान्य केल्या असून हा मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय मानला जात आहे.



मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार जीआर जारी केला आहे. यामुळे मराठा समाजातील असंख्य बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळून आरक्षणाचा लाभ घेण्याचे दरवाजे आता खुले झाले आहेत.या निर्णयामुळे मराठा समाजाच्या दीर्घकालीन संघर्षाला न्याय मिळाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.








