
सोलापूर – नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी नानासाहेब काळे विचारमंचातर्फे महाप्रसाद वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. सोलापूरच्या बलिदान चौकात हा उपक्रम पार पडला.
तुळजापुराकडे निघालेल्या देवीभक्तांचे स्वागत करत विचारमंचाच्या कार्यकर्त्यांनी प्रसादाचे वाटप केले व भक्तांचे पायधूळ घेऊन सत्कार केला.
या वेळी भक्तांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून आला.

कार्यक्रमावेळी जयंत शेळके, प्रवीण इरकशेट्टी, निशांत सावळे, बाबू बनसोडे, तम्मा गुडूर, दत्ता बनसोडे, सौरभ कन्हेरे, अंकुर जाधव, अथर्व शिंदे, जयराज बिराजदार, सार्थक साखरे, ओम अंदेली, अजिंक्य गवळी, कुणाल फडतरे, शशी भाईकट्टी, अभिजीत कांबळे आणि नागराज घोंगडे उपस्थित होते.

या उपक्रमाबद्दल भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करून विचारमंचाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. धार्मिक श्रद्धा, सामाजिक जबाबदारी आणि सेवाभावाचा सुंदर संगम या महाप्रसाद वितरणातून दिसून आला.