Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur

MH13 News by MH13 News
6 months ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
‘जावया’वर कोयत्याने हल्ला प्रकरणी न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल..! Solapur
0
SHARES
52
VIEWS
ShareShareShare

MH13NEWS network

सोलापूर, दि. ७ —घरगुती वादातून जावयावर कोयत्याने हल्ला केल्याच्या आरोपाखालील सोलापूरच्या पाच जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

निर्दोष ठरलेल्यांमध्ये राचय्या हिरेमठ (५०), विजयालक्ष्मी हिरेमठ (४८), प्रिया संबाळ (२५), विशाल हिरेमठ (२३) आणि केदार हिरेमठ (२०) यांचा समावेश आहे. यांच्यावर जावई सोमप्रकाश संबाळ, श्रीदेवी संबाळ आणि सिद्धरामय्या संबाळ यांच्यावर खुनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याचा आरोप होता.

📌 प्रकरणाची हकीकत:

१३ एप्रिल २०२० रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जुन्या वैरातून आरोपींनी फिर्यादींच्या घरात घुसून कोयत्याने हल्ला केल्याची फिर्याद विजयालक्ष्मी संबाळ यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिली होती. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बी. एच. पाटील यांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केले.प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात चाललेल्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली.

सरकारी वकीलांनी डॉक्टरांच्या साक्षी आणि शस्त्रजप्तीच्या पुराव्यांवर भर देत आरोपींना दोषी ठरवण्याची मागणी केली.मात्र आरोपींच्या वतीने अ‍ॅड. शशि कुलकर्णी आणि अ‍ॅड. विद्यावंत पांढरे यांनी ठोस युक्तिवाद केला की — “साक्षींमध्ये विसंगती आहे, डॉक्टरांची साक्ष कथानकाला पूरक नाही, आणि फिर्याद उशिरा दिल्याने घटनाक्रम संशयास्पद ठरतो.”

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

🔹 खटल्यातील वकिलांची बाजू:

आरोपीतर्फे अ‍ॅड. शशि कुलकर्णी, अ‍ॅड. विद्यावंत पांढरे, अ‍ॅड. प्रणव उपाध्ये, अ‍ॅड. प्रसाद अग्निहोत्री आणि अ‍ॅड. रणजित चौधरी यांनी तर सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी काम पाहिले.

Tags: Adv Shashi KulkarnisolapurSolapur Maharashtra
Previous Post

‘त्या ‘ वृद्धेच्या खूनप्रकरणी हायकोर्टाचा जामीन ; अ‍ॅड. रितेश थोबडे यांचा ठोस युक्तिवाद..

Next Post

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.