Monday, April 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

संपर्क, संघटन आणि सोशल मीडियावर भर द्या; भाजप उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
संपर्क, संघटन आणि सोशल मीडियावर भर द्या; भाजप उमेदवारांच्या बैठकीत पालकमंत्र्यांचे मार्गदर्शन
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर – (प्रतिनिधी)

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रत्येक मतदारापर्यंत थेट संपर्क साधून भाजपाची ध्येयधोरणे, विकासकामे व शासनाच्या योजना पोहोचवाव्यात, असे स्पष्ट आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी हॉटेल बालाजी सरोवर येथे भाजप उमेदवारांची बैठक पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी आमदार दिलीप माने, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भाजप पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवत असून उमेदवारांनी प्रभागनिहाय व्यापक जनसंपर्क साधावा. केंद्र व राज्यात भाजप सरकारने केलेली विकासकामे, धुळमुक्त सोलापूर, पाणीपुरवठ्यासाठी मंजूर ८९२ कोटी रुपये, विमानसेवा, आयटी पार्क, लाडकी बहीण योजना यांची माहिती घरोघरी जाऊन नागरिकांना द्यावी. केंद्र व राज्यात सत्ता असल्यामुळे सोलापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देता येईल, हे नागरिकांपर्यंत पोहोचवावे, असेही त्यांनी सांगितले.

तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी स्वतंत्र कार्यकर्त्यांचे गट तयार करावेत, सोशल मीडियावर अधिक सक्रिय राहावे आणि मतदार यादीतील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांनी मार्गदर्शन करताना बूथरचना, मतदार संपर्क, प्रचार नियोजन व हिशोब यामध्ये शिस्तबद्ध आणि नेटके काम करण्यावर भर दिला. सोलापूर महापालिकेची ही निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची असल्याने आवश्यक सर्व तांत्रिक प्रक्रिया वेळेत पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शहरवासीयांचा भाजपाला पाठिंबा मिळवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीस भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

ECINet ॲपमध्ये सुधारणांसाठी १० जानेवारीपर्यंत सूचना सादर

Next Post

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.