Saturday, August 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

mh13news.com by mh13news.com
4 months ago
in आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
24
VIEWS
ShareShareShare

MH 13 News network

सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी कामगिरी करत, शहरातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट आणि हृदयविकार तज्ज्ञ डॉ. बसवराज सुतार यांना लखनौ येथे पार पडलेल्या CSI NIC च्या वार्षिक परिषदेत ‘Shining Star Award 2026’ या मानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


हृदयविकार क्षेत्रातील उत्कृष्ट आणि परिणामकारक कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, डॉ. सुतार यांच्या या यशामुळे सोलापूरसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या हन्नूर येथून येत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत डॉ. सुतार यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी देशपातळीवर आपली छाप उमटवली आहे.


शैक्षणिक प्रवासात त्यांनी सोलापूर येथील डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमधून MBBS पूर्ण केले. त्यानंतर दिब्रुगढ येथून MD (मेडिसिन), कोइम्बतूर येथून DNB (कार्डिओलॉजी) आणि हैदराबाद येथील AIG हॉस्पिटलमध्ये प्रख्यात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इलेक्ट्रोफिजिओलॉजीचे सुपर स्पेशलायझेशन पूर्ण केले.


सध्या डॉ. सुतार हे सोलापूर व पंढरपूर येथे ‘हृदय स्पंदन हार्ट केअर’ क्लिनिक, अश्विनी रुग्णालय तसेच यशोधरा रुग्णालय येथे रुग्णसेवा देत आहेत. ते सोलापूर आणि परिसरातील एकमेव इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट असून, हृदयाच्या ठोक्यांमधील अनियमितता (अरिथमिया) यांसारख्या गुंतागुंतीच्या विकारांवर अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात त्यांना विशेष प्रावीण्य आहे.


फौजदार चावडी पोलीस स्टेशनसमोर असलेल्या त्यांच्या ‘हृदयस्पंदन हार्ट केअर’ क्लिनिकमधून तसेच कुंभारी येथील अश्विनी ग्रामीण रुग्णालयातूनही ते रुग्णांची सेवा करत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्यांनी सोलापूर, पंढरपूर आणि ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यल्प खर्चात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली आहे.


ग्रामीण भागातील रुग्णांसाठी परवडणाऱ्या दरात अत्याधुनिक उपचार देण्याच्या त्यांच्या कार्यामुळे डॉ. सुतार हे ‘डॉक्टर’पेक्षा ‘आधारवड’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags: डॉक्टर सुतार शायनिंग स्टार लखनऊ
Previous Post

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

Next Post

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.