mh 13 news network
इंट्याक सोलापूर वतीने हेरिटेज वॉक – वारसा फेरीचे आयोजन*
*निसर्ग, भूगर्भशास्त्र आणि इतिहासाचा त्रिवेणी संगम; खडकीतील चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक ‘ ची शासनाकडे साद!*
जानेवारी २०२६:
भारतीय राष्ट्रीय कला व सांस्कृतिक वारसा न्यास (INTACH)- इंट्याक सोलापूर शाखेच्या वतीने, सोलापूरच्या भूमीत सुप्त असलेल्या ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी नियमित ‘वारसा फेरी’ (Heritage Walk) आयोजित येते असते. नुकत्याच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खडकी येथील आढळून आलेल्या भारतातील सर्वात मोठा चक्रव्यूह, ज्याचे दोन हजार वर्षाचे गूढ हे अभ्यासण्यासाठी व समजून घेण्यासाठी इंट्याक सोलापूर वतीने अद्वितीय वारसा फेरी रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेसात वाजता संपन्न झाली.

*भल्या पहाटे निसर्ग आणि इतिहासाची जुळली नाळ ![]()
आज रविवारी भल्या सकाळी साडेसात वाजता बोरामणी येथील गवताळ सफारीपासून या वारसा फेरीला प्रारंभ झाला. प्रसन्न वातावरणात पक्षी निरीक्षण आणि प्राणी दर्शन घेत असतानाच, या फेरीचे मुख्य आकर्षण असलेल्या ‘चक्रव्यूह’ स्थळी सर्व सहभागी पोहोचले. प्रामुख्याने आकर्षण असलेले चक्रव्यूह हे पाहण्यासाठी सोलापुरातील सर्व स्तरातील साधारणतः शंभरहून अधिक अभ्यासक इतिहासप्रेमींची अक्षरशः मांदियाळी जमली होती.
*शोधापासून निष्कर्षापर्यंतचा प्रवास ![]()

कार्यक्रमाच्या सुरुवातीला निसर्गप्रेमी भरत छेडा यांनी या वारसा स्थळाचा शोध कसा लागला आणि त्या अनुषंगाने करण्यात आलेला पाठपुरावा यावर प्रकाश टाकला. खडकी परिसरातील गवताळ सफारी लगत अशा प्रकारचे आणखी काही चक्रीय अवशेष असण्याची दाट शक्यता त्यांनी यावेळी प्रकर्षाने मांडली.
इतिहास तज्ज्ञ नितीन अणवेकर यांनी या संरचनेचा ऐतिहासिक संदर्भ उलगडताना सांगितले की, हा चक्रव्यूह साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वीचा असावा. या संदर्भात त्यांनी डेक्कन कॉलेजच्या इतिहास विभाग प्रमुख डॉ. सचिन पाटील आणि चक्रव्यूह विषयाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. साबळे यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेअंती असा निष्कर्ष समोर आला आहे की, खडकी येथील हा चक्रव्यूह सद्यस्थितीतील भारतातील सर्वात मोठ्या चक्रव्यूहांपैकी एक असून, त्याच्या रचनेचे खगोलशास्त्रीय आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण होणे काळाची गरज आहे.
*भूगर्भशास्त्रीय विशेष आणि तांत्रिक रचना ![]()
महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख (भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, सोलापूर) यांनी या चक्रव्यूहाच्या तांत्रिक बाजू मांडल्या. त्यांच्या मते, ही संपूर्ण रचना स्थानिक ‘बेसॉल्ट’ (Basalt) प्रकारच्या दगडापासून बनलेली आहे. विशेष म्हणजे, कोणताही सिमेंट किंवा इतर सांधा वापरल्याशिवाय केवळ दगडांच्या रचनेतून हा पंधरा वर्तुळांचा भुलभुलय्या उभा करण्यात आला आहे. याची मोजमापे आणि मांडणी अत्यंत अचूक असून ती तत्कालीन समाजाच्या तांत्रिक प्रगल्भतेची साक्ष देते.
या प्रसंगी ज्या जमिनीवर हा अमूल्य वारसा सापडला, त्या जमिनीचे मालक शेतकरी विनोद चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाचा, तसेच मार्गदर्शन करणाऱ्या तिन्ही तज्ज्ञांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव आणि स्वागत, सत्कार करण्यात आला.
*शासनाकडे संवर्धनाची विनंती ![]()
इंट्याक सोलापूरचे समन्वयक आणि वारसा फेरीचे संयोजक प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. “खडकी येथील हा वारसा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी भूषणावह आहे. हा केवळ दगडी ढिगारा नसून आपल्या पूर्वजांनी मागे ठेवलेला ज्ञानाचा वारसा आहे. या स्थळाचे महत्त्व लक्षात घेता पुरातत्व विभाग, जिल्हा प्रशासन, पुरातत्त्व विभाग, राज्य सरकार आणि राष्ट्रीय स्तरावरील यंत्रणांनी- याची तात्काळ दखल घेऊन जतन व संवर्धन करावे “, अशी विनंती वजा अपेक्षा- आग्रही मागणी डॉ. काटीकर यांनी यावेळी केली.
या वारसा फेरीस सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पप्पू जमादार, विकास कुलकर्णी, अच्युत काटीकर, डॉ. भीमगोंडा पाटील, डॉ. धानेश लिगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी ज्येष्ठ संपादक मिलिंद कुलकर्णी, उद्योजक युवराज चुंबळकर, उद्योजक हेमंत साठे, पर्यावरण तज्ज्ञ निनाद शहा, प्रा. असीम चाफळकर, श्रीकांत अंजूटगी, शांता येळंबकर, गीतांजली दीड्डी यांसह सोलापुरातील विविध क्षेत्रांतील शंभरहून अधिक इतिहासप्रेमी, अभ्यासक आणि नागरिक अनेक मान्यवर या अद्भुत वारशाचे साक्षीदार होण्याइंट्याक सोलापूर वतीने हेरिटेज वॉक – वारसा फेरीचे आयोजन*
*








