Tuesday, April 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रणिती शिंदेंचा ‘मॉर्निंग वॉक’| भाजपच्या कारभारावर साधला निशाना

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
0
0
SHARES
60
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

सोलापूर महानगरपालिकेवर तसेच केंद्रात एकहाती १० वर्षे सत्ता असताना देखील भाजपला विकास साधता आला नाही. सगळीकडे भाजपचा भोंगळ कारभार सुरू असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली. प्रणिती यांनी आज (शुक्रवारी) सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या आवारात मार्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

यावेळी बोलताना प्रणिती म्हणाल्या, महानगरपालिकेचा कार्यकाळ संपून २ वर्षे झाली. अद्याप निवडणूकीचा पत्ता नाही. प्रशासक नेमले गेले आहेत. त्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. पाण्याच्या नियोजनाचा तर बोजवारा उडाला आहे. शहरात आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. ते देखील पाणी अशुध्द आहे. हद्दवाड तसेच पूर्व भागात तर रात्री १-२ वाजता अचानक पाणी सोडले जाते. त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. विमानसेवेचा पत्ता नाही. उद्याच विमान लँड करणार असल्याचा आव आणत घाई गडबडीत चिमणी पाडली. तेव्हाच मी म्हटले होते. पुढील सहा महिने विमानसेवा सुरू होणार नाही, आता सात महिने होत आले असल्याचा टोला देखील प्रणिती शिंदे यांनी यावेळी लगावला.

सोलापूर महानगर पालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन सेवेचा बोजवारा उडाला आहे. भाजपचे लोकं फक्त आश्वासन देतात त्याची पूर्तता करत नाहीत. आत्ता तर भाजपचे लोकं उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. ही गंभीर बाब आहे. आपली लोकशाही धोक्यात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला निवडून द्या, असे आवाहन प्रणिती यांनी यावेळी केले.

Tags: praniti shinde CongressSolapur Loksabha electionSolapur Maharashtra
Previous Post

राज्यात ओपिनियन आणि एक्झिट पोलला निवडणूक कालावधीत प्रतिबंध…

Next Post

पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया…

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

26 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
Next Post
महसूल संकलनाची विक्रमी ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर .

पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.