सोलापुरातील राहुल गांधी झोपडपट्टी येथे राहणाऱ्या रेहान जावेद बागवान वय वर्ष 18 या युवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या कुटुंबाला मदत देण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा बागवान युवक जमीन यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.
रेहान हा भंगारच्या गाडीवर काम करत होता त्याला दोन बहीण आणि आई असा परिवार होता. मृत रेहानची आई कुटुंब भागवण्यासाठी मोल मजुरी करत असे. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. बागवान कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट होती.दुर्दैवाने अचानकपणे घरातील कर्ता मुलगा गमावल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले होते.
या दुःखद प्रसंगाची माहिती मिळताच जुबेर बागवान यांनी सहकारी बांधवांच्या मदतीने 65 हजार रुपयाची रोख रक्कम रेहानच्या कुटुंबियाला दिली.
यावेळी संघटनेचे मुन्ना मिरची वाले, फेरोज तुळजापुरे ,आरिफ मर्चंट, अनवर बागवान, रिजवान कल्याणी ,आबिद मैंदर्गीकर, नजाकत अली मंद्रूपकर आदी समाजबांधव उपस्थित होते.सोलापुरातील शहर जिल्ह्यातील बागवान समाजासाठी सामाजिक कार्यकर्ते जुबेर बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बागवान युवक जमीयात संघटनेची निर्मिती केली आहे.
समाजाची बांधणी करण्याचा मुख्य उद्देश बागवान समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा होता. सुखाच्या वेळी सर्व समाज एकत्र येईल परंतु अशा दुःखद प्रसंगी मदत करणे हीच खरी मानवसेवा आहे. यापुढे सुद्धा बागवान समाजातील अडीअडचणी प्रसंगी आम्ही दिवस-रात्र खंबीरपणे सोबत राहणार आहोत.
जुबेर बागवान संस्थापक,बागवान युवक जमियत