Mh13news Network
देहविक्रय करणाऱ्या वारांगनांना “माहेरची साडी ” दारी साजरी केली दिवाळी
संभव फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
भाऊबीजेच्या पुर्वसंध्येला समाजात उपेक्षित असणाऱ्या वारांगनासोबत यंदाची दिवाळी साजरी करून संभव फाउंडेशने अनोखी भाऊबीज साजरी करत दिवाळी सण मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला.
देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या अंधाऱ्या आयुष्यात संभव फाउंडेशनने एक दिवा समतेचा वारांगनाच्या दारात लावून लख्ख उजेड देण्याचा प्रयत्न केला.

सोलापूरातील तरटी नाका परिसरातील देहविक्रय करणाऱ्या
वारांगनासोबत भाऊबीज साजरा करून उपस्थित महिलांना शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त डॉ दिपाली काळे यांच्या हस्ते झाले.प्रमुख उपस्थिती म्हणून साहित्यिक समीर गायकवाड व सपना रांभीया, डॉ प्रमोद काळे यांची उपस्थिती होती.
मान्यवरांच्या उपस्थितीत वारांगनाच्या दारात दिवा लावून उपस्थित महिलांना दिवाळीचा फराळ,साडी,मिठाई भेट देत त्यांच्यासोबत
भुईचक्कर,झाड,फुलबाजा,असे फटाके उडवत उपस्थित शुभेच्छा देण्यात आल्या.यंदाच्या वर्षी एड्स वर जनजागृतीचा संदेश देण्यात आला होता. जनजागृतीचे पोस्टर प्रदर्शन करून सामाजिक संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट, क्रांती महिला संघाच्या रेणुका जाधव,आकाश बनसोडे,चेतन लिगाडे,गणेश पवार,पवन व्हनकवडे, तुषार आवताडे, अनिकेत गायकवाड,प्रेरणा बनसोडे, अमोल रामनवरे,विशाल घंटे, सुकन्या रामनवरे,गजल शेख,आतिश सोनवणे, शैलेश आवळे,रवी सोनकांबळे, महेश शिवशरण, संतोष माने आदींची उपस्थिती होती.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल घंटे यांनी तर आभार पवन व्हनकवडे यांनी मानले.


