Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून -जिल्हाधिकारी किशन जावळे

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
रायगड लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया उद्यापासून -जिल्हाधिकारी किशन जावळे
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

अलिबाग : 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया १२ एप्रिल २०२४ रोजी सुरू होत आहे. १२ ते १९ एप्रिल २०२४ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी रायगड तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय अलिबाग येथे नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येतील. तसेच या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या ७ मे रोजी मतदान होत असून संपूर्ण जिल्ह्यातील २३ लाख १६ हजार ५१५ मतदारांची यादी २३ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झाला असून नामनिर्देशनपत्र भरणेसाठी सर्वसाधारण सूचना करण्यासाठी दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर आवश्यक बाबीची माहिती राजकीय पक्षांची बैठक घेऊन देण्यात आली आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारले जाणार नाहीत.

ते म्हणाले, जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. आयोगाचे निर्देशानुसार 32 रायगड लोकसभा मतदार संघामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.  रत्नागिरी जिल्हा मधील दापोली व गुहागर विधानसभा क्षेत्राचा समावेश होतो त्यातील मतदारांसह  मतदारसंघामध्ये एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. मतदानादिवशी मतदान प्रक्रियेचे लाईव्ह वेबकास्टीग केले जाणार आहे.

निवडणुकीबाबतची नियम 3 मधील नमुनाची निवडणुकीची सूचना 12 एप्रिल 2024 रोजी वर्तमान पत्रातून प्रसिध्द करण्यात येणार आहे. याची प्रसिध्दी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेसह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी. तहसील कार्यालये, रायगड, रत्नागिरी जिल्हयातील पंचायत समिती कार्यालय, नगरपालिका व नगर पंचायत कार्यालय, सर्व ग्रामपंचायती ठिकाणी लावण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, निवडणूक पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सक्षम ॲप, आपले उमेदवार ओळखा ॲप, सी-विजिलॲप, बोगस व्होटर ॲप यासह तंत्रज्ञानाचा वापर करून प्रणाली कार्यरत आहेत. पोस्टल मतदारांसाठी साठी (इटीपिबियस )प्रणाली वापरताना प्रशासनाकडून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहेत. या अनुषंगाने कारवाई करताना जिल्ह्यात १६९१ पैकी १४०९ शस्त्रे जमा झाली असून राज्यात रायगड जिल्हा पाचव्या क्रमांकावर आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने २१६ गुन्हे दाखल केले आहेत. भरारी पथके कार्यरत झाली आहेत.  व्हिडिओ निरीक्षण पथक (व्हिडिओ सर्विलंस टीम- व्हीएसटी), खर्च निरीक्षण पथक अशी विविध पथके स्थापन करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वेळोवळी देण्यात येईल .तसेच मतदान बुथ, वोटर हेल्पलाईन विविध ॲपची  माहिती दिली. मतदान प्रक्रियेबाबत माहिती व दिव्यांग मतदारांना मतदानासाठी असलेल्या सेवासुविधाची माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी दिली.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या  सूचनांचे पालन करावे- जिल्हाधिकारी किशन जावळे
रायगड दि. ११ (जिमाका) : रायगड 32 लोकसभा मतदार संघासाठी दि. 12 एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ आहे. सर्व उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्वसाधारण सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा 32 रायगड लोकसभा मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्षांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, खर्च पथक प्रमुख राहुल कदम, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्र निवडणूक अधिसूचनेत नमूद केलेल्या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाहीत. दि. 12, 15,16, 18, 19 एप्रिल या दिवशी 11 ते 3 या वेळेत स्विकारले जाणार आहेत. एका उमेदवारास अधिकाधिक ४ नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. दोनपेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघात नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करणारे उमेदवाराचे वय २५ वर्षापेक्षा कमी नसावे.
ते पुढे म्हणाले, नामनिर्देशनपत्र हे नमुना २अ मध्ये दाखल करावे, त्यासोबत नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र सादर करावे. नामनिर्देशनपत्राचा नमुना २अ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. नमुना २६ मधील प्रतिज्ञापत्र पूर्णपणे भरलेले असणे आवश्यक आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १७३ (अ) अन्वये उमेदवाराने स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्राधिकृत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष छाननीपूर्वी शपथ घ्यावी लागेल.
नामनिर्देशनपत्र दाखल करता वेळी येणारी वाहने, व्यक्ती, मिरवणूक व इतर बाबी यावर होणारा खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात बंधनकारक राहील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयीन परिसरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची उमेदवारांनी किंवा त्यांचे प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी, असेही श्री.जावळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
भारत निवडणूक आयोगाच्या ह्या सर्वसाधारण स्वरुपाच्या आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करताना  मार्गदर्शक सूचना व तरतूदीनुसार परिपूर्ण नामनिर्देशनपत्र भरण्याची व त्यासोबत आवश्यक ती कागदपत्रे दाखल करण्याची अंतिम जबाबदारी ही उमेदवाराची आहे , असेही  जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले.
उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारयादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशनपत्रासोबत दाखल करणे बंधनकारक राहील. उमेदवार स्वतः किंवा त्यांचे कमीत कमी एका प्रस्तावकाने स्वतः उपस्थित राहून नामनिर्देशनपत्र दाखल करावे.


पाच व्यक्तींना प्रवेश
जिल्हाधिकारी म्हणाले, नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात उमेदावारासहीत एकूण ५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. (त्यामध्ये उमेदवार व त्यांचे चार प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येईल.) नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराच्या केवळ ३ वाहनांना कार्यालयाच्या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. वाहने वाहनतळावरच उभी करण्याची अनुमती राहील. उमेदवार हा ज्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे त्याच लोकसभा मतदारसंघातील मतदार हे प्रस्तावक असणे बंधनकारक राहील.
सर्वसाधारण उमेदवारांसाठी अनामत रक्कम २५ हजार रुपये व उमेदवार अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील असल्यास १२ हजार ५०० रुपये भरल्याची पावती किंवा चलनाची प्रत नामनिर्देशनपत्रासोबत जोडणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात, जमात प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत सादर करावी.

Previous Post

जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी; आतापर्यंत २४ लाखापेक्षा अधिकचे मद्य जप्त ⭕

Next Post

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १२०५ गृहमतदारांनी केले मतदान ⭕

Related Posts

अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा
महाराष्ट्र

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे 89 व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीत शोककळा

24 November 2025
लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र

लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी नवीन मुदत – ३१ डिसेंबर २०२५

18 November 2025
बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी केंद्राकडून बिबट नसबंदीला मंजुरी
मनोरंजन

बिबट–मानव संघर्ष रोखण्यासाठी केंद्राकडून बिबट नसबंदीला मंजुरी

18 November 2025
Next Post
गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १२०५ गृहमतदारांनी केले मतदान ⭕

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १२०५ गृहमतदारांनी केले मतदान ⭕

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.