Friday, February 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी – कर्मचारी यांच्यासाठी निवास, आरोग्य आणि भोजन व्यवस्थाही पाहणार

मुंबई उपनगर,: मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास ५० हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक कालावधीत या कर्मचाऱ्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय कल्याण अधिकारी अर्थात वेल्फेअर ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुक कालावधीत एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असतानाच या यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही काळजी आता विशेषत्वाने घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघात हे वेल्फेअर ऑफिसर नियुक्त केले आहेत. निवडणूक प्रक्रिया आणि विशेष करून मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवास, भोजन, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे या सुविधा पुरविण्याबाबत येत आहेत.

कॅशलेस आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देणार

            आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास तत्काळ उपचार करण्याबाबतची कार्यवाहीही वेल्फेअर ऑफिसर यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

            या वेल्फेअर ऑफिसर यांच्याकडे मतदान केंद्राजवळ असलेली सर्व रुग्णालये, तेथे उपलब्ध असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा, रुग्णवाहिकेची उपलब्धता आदींची माहिती असणार आहे. याशिवाय, कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यकता भासल्यास तत्काळ कॅशलेस आरोग्य सुविधा संबंधित रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

            मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कालावधीत कोणतीही अडचण उद्भवू नये याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

Previous Post

निवडणूक कालावधीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही असणार सज्ज; मतदारांना कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाने उचलली पावले

Next Post

२६ – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

२६ – मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील राजकीय प्रतिनिधींसोबत बैठक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.