‘जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव’तर्फे आयोजन
सोलापूर : ‘बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवांतर्गत मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील पाच नंदीध्वजांचे पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव व जुळे सोलापूरवासियांतर्फे करण्यात आले. नंदीध्वजांना आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. यावेळी नंदीध्वजांचे विधिवत पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली. वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी मंत्रोच्चाराचे पठण केले. सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख राजशेखर हिरेहब्बू, सुदेश देशमुख, साईनाथ अंजिखाने, संगमेश्वर बिराजदार, कुमार शिरसी, सोमनाथ मेंडके, सोमनाथ सरडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ‘जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव’चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप तडकल, प्रा. पल्लवी तडकल, रमेश पाटील, मल्लू आकळवाडे, अजय पोनम, शरणराज केंगनाळकर, पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, आनंद मुस्तारे, लक्ष्मीकांत तमनवरू हे उपस्थित होते.
रुकुम बागवान, ताजोद्दीन जुनेदी, विठ्ठल झिप्रे, नागेश ढवणे दाम्पत्य यांनी यावेळी भक्तिगीते सादर केली.
पूजेचे मानकरी
पल्लवी व प्रदीप तडकल, प्रिया व प्रशांत तडकल, प्रज्ञा व संजय शिंदे, जयश्री व गुणवंत चव्हाण, लक्ष्मी व महेश बिराजदार या पाच दाम्पत्यांच्या हस्ते पाच नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले.
कामगौंडा बिराजदार, औदुंबर आगलावे, संजीव जम्मा, प्रांजली तडकल, रविशंकर गिरवलकर, गणेश गिरवलकर, अरुष गिरवलकर, उदय घाटे, अजय आगलावे, शंकर चव्हाण, श्रीशैल तळवार, किरण गर्जे, सविता माने, सपना माने, पार्वती शाबादी, आरती पाटील, स्मिता ढेरे, सुनिता दानवडे, राणी पुजारी, सूर्यकांत पाटील, श्रेया गुडनाळे, जयराज जम्मा, अनिल संगमवार, सूर्यकांत होणमाने, मायप्पा पडळकर, महादेव पुजारी, भास्कर बंदपट्टे, व्ही. एस. कापसे, डॉ. विपुल शेंडगे, डॉ. मल्लिकार्जुन दंडवते, समर्थ गर्जे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव व जुळे सोलापूरवासियांतर्फे पाच नंदीध्वजांचे पूजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.