सोलापूर दि. 05
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारण, सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये लगत असलेल्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले असून, सदरची अतिक्रमणे 7 दिवसांच्या आत स्वखर्चान अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारणामार्फत करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारण, सोलापूर यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये (क्र.65) कि.मी .150 / 050 ते कि.मी. 251/325 या रस्त्यारचे विस्तारीकरण काम करण्यास अडथळा होत आहे. रा.म.क्र. 65 सोलापूर (महाराष्ट्र), कर्नाटक बॉर्डर सेक्शन किमी.249/000ते किमी. 348 /800 (सोलापूर जिल्हयातील सा.क.249/000 ते सा.क.269/800 पर्यंत ) रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूस रस्त्याच्या हद्दी पर्यंत अनधिकृत अतिक्रमणे असून,या रस्त्याच्या विस्तारीकरणास अडथळा निर्माण होत आहे.
राष्ट्रीय राजमार्ग क्र. 52 सोलापूर येडशी सेक्शन कि.मी.0 /000 ते 100 /000 (डिझाईन लांबी 98.717कि.मी.) (सोलापूर जिल्हयातील सा.क. 0/000 ते सा.क. 16 /400 पर्यंत ) व सोलापूर -विजयपूरा सेक्शन किमी. 0/00 ते 110 /542 (सोलापूर जिल्हयातील सा.क. 13 / 600 ते सा क. 30/300 पर्यंत .) या रस्त्याच्या विस्तारिकरणास अडथळा होत आहे. रस्त्याच्या मध्यापासून डाव्या व उजव्या बाजूस अनधिकृत अतिक्रमणे असून,या रस्त्याच्या विस्तारीकरणास अडथळा निर्माण होत आहे.
राष्ट्रीय राजमार्ग क्र. 166 बोरगांव – वाटंबरे सेक्शन कि.मी. 224/000 ते कि.मी. 276/000 (सोलापूर जिल्हयातील सा.क.253/000 ते सा.क.276/000 पर्यंत) पॅकेज 2 या व वाटंबरे मंगळवेढा कि.मी. 276/000 ते कि.मी. 321/600 पॅकेज 3, तसेच मंगळवेढा सोलापूर सेक्शन 321/600 ते कि.मी.378/100 पॅकेज 4 या रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूचे अतिक्रमण झाल्याने रस्त्याचे विस्तारीकरणाच्या काम करण्यास अडथळा होत आहे. राष्ट्रीय राजमार्ग क्र. 150 (इ) अक्कलकोट -सोलापूर सेक्शन किमी.99 / 400 ते किमी.138/ 352 या रस्त्याच्या मध्यापासून उजव्या व डाव्या बाजूचे अतिक्रमण.रस्त्याच्या विस्तारिकरणास अडथळा होत आहे.
सदर ठिकाण चे अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विना परवाना बांधकाम नोटीस दिल्यापासून सात दिवसाचे आत स्वखर्चाने त्वरीत काढून घ्यावे , अन्यथा सदरचे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण. सोलापूर यांच्या वतीने दि कंट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड ॲन्ड ट्राफिक ) ॲक्ट 2002 अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधीत धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. अशा सुचना भारतीय राष्ट्रीय राजमार्गाचे उपमहाप्रबंधक तथा परियोजना निदेशक सोलापूर यांनी दिल्या आहेत.