Wednesday, April 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात
0
आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाची कारवाई

MH 13 NEWS NETWORK

मुंबई  : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अमली पदार्थाचे रॅकेट उघड झाले असून त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यामध्ये एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर अंदाजित १३५ कोटी रकमेचे १९९.२९ किलो अल्प्राझोलम तसेच एक वाहन आणि दोन कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास आणि कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या मुंबई पथकाने कान्हूर मेसाई तालुका शिरुर, जि.पुणे याठिकाणी एका संशयित वाहनाला अडवून त्यातील साहित्याची बारकाईने तपासणी केल्यावर संशयास्पद पावडर आणि काही प्रयोगशाळेची उपकरणे आढळून आली. याचा पाठपुरावा करताना एक गुप्त युनिट मिडगुलवाडी, (जिल्हा, पुणे) येथे सापडले. याची तपासणी करताना त्या गुप्त प्रयोगशाळेत 173.34 किलो अल्प्राझोलमचे उत्पादन कच्च्या मालासह सापडले. या गुप्त प्रयोगशाळेत अत्याधुनिक गोष्टी होत्या, यामध्ये उपकरणे, जनरेटर, ड्रायर इत्यादी साहित्य आढळून आले. पुढील एका कारवाईत नारायणगाव जवळ, ता.आंबेगाव, जि. पुणे येथे २५.९५ किलो अल्प्राझोलम कच्च्या मालाच्या प्रचंड साठ्यासोबत आणखी एक गुप्त उत्पादन युनिट आढळून आले. दोन्ही युनिट हे दुर्गम भागात जेथे वाहनाने पोहोचणे कठीण आहे, अशा ठिकाणी होते. याबाबतच्या सविस्तर तपासात असे आढळून आले की या दोन्ही ठिकाणी अमंलीपदार्थाचा (ड्रग्ज) पुरवठा करणाऱ्या एकाच समूहाद्वारे या गुप्त लॅब चालवल्या जात होत्या.

तसेच मंचर येथे ताडीचे दुकान चालवणारा एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या अल्प्राझोलमची विक्री करताना त्याला अटक करण्यात आली. पुणे येथून या सर्व बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या एका महत्वाच्या सूत्रधाराची माहिती मिळाली, त्याला त्याच्या एका साथीदारासह मिरारोड, ठाणे येथून अटक करण्यात आली. या तपास प्रक्रियेत सबळ माहिती आणि आक्षेपार्हय पुरावे सापडले आहेत. अवैध उत्पादित अल्प्राझोलम महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये विशेषतः अवैधरित्या ताडी तयार करण्यासाठी विकले जात होते. अल्प्राझोलमचा उपयोग कृत्रिमरीत्या ताडीची क्षमता वाढवण्यासाठी आणि कृत्रिम ताडी तयार करण्यासाठी केला जातो. अशी भेसळयुक्त ताडी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात याची एक मोठी बाजारपेठ आणि समाजाच्या निम्न स्तरातील ग्राहकवर्ग याच्याकडून याची खरेदी होते.

निवडणूक आचारसंहितेच्या काळात मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी वापरल्या जाऊ शकणाऱ्या अशा अवैध उत्पादनाला आणि वाहतुकीला अटकाव करणाऱ्या कार्यवाहीत मोठे यश मिळाले आहे.

०००

Previous Post

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान

Related Posts

गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

26 March 2026
गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आणखी 11 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी
गुन्हेगारी जगात

मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आणखी 11 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी

5 January 2026
Next Post
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.