Tuesday, August 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जगाच्या कल्याणासाठी आदि शंकराचार्यांचे जीवनकार्य महान – ज्ञानराज माणिकप्रभु

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in धार्मिक, सोलापूर शहर
0
जगाच्या कल्याणासाठी आदि शंकराचार्यांचे जीवनकार्य महान – ज्ञानराज माणिकप्रभु
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर,(प्रतिनिधी):- मानवी जीवन कल्याणासाठी आदी शंकराचार्यांचे जीवन कार्य महान आहे असे प्रतिपादन माणिकप्रभु पिठाचे श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी केले. डॉ. राजीव दबडे आणि डॉ. माधुरी दबडे यांच्या कृष्णामाई हॉस्पिटलच्या वतीने आयोजित आदि शंकराचार्य यांच्या जयंती निमित्त रविवार दि. 5 मे रोजी सायंकाळी 6 वाजता हिने वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते.


आदि शंकराचार्यांनी भारत देशासह जगाच्या कल्याणासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आणि जीवनशैली अवघ्या काही तासात सांगता येत नाही एवढे महान कार्य त्यांचे आहे. माणिक प्रभु संस्थान माणिकनगर पिठाचा आणि सोलापूरचा संबध गेल्या 200 वर्षापासूनचा आहे. माणिकप्रभु महाराज यांचे वास्तव्य सोलापूरमध्ये काही वर्षे राहिलेले आहे. असेही श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी सांगितले. श्रीराम भुजंगप्रयात स्तोत्राचे वाचन करणारा स्वतःच श्रीराम होवून जातो. वेदाचा सार म्हणजेच श्रीराम भुजंगप्रयात स्तोत्र आहे. असेही सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांनी सांगितले. आदि शंकराचार्यांच्या सखोल योगदानावर प्रकाश टाकून श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्र आणि एक श्‍लोकी या रचनावर त्यांनी प्रकाश टाकला. श्रीराम भुजंग प्रयात स्तोत्रातील शेवटच्या ओळीवर ज्ञानराज माणिकप्रभुंनी विशेष भर दिला ज्यामध्ये आदि शंकराचार्य आपल्या शिष्यांना प्रभु रामचंद्रासारखे होण्याची आकांक्षा बाळगण्यास प्रोत्साहित करतात. आत्म साक्षात्काराचे अंतिम उद्दिष्टावर प्रकाश टाकतात. हे व्याख्यान म्हणजे आध्यात्मिक समृध्द करणारे सत्र होते. उपस्थितांना आत्म शोध आणि अनुभुतीच्या प्रवासाला सुरूवात करण्यास उद्युक्त करणारे ठरले. प्रारंभी उपस्थितांकडून श्री सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. नंतर डॉ. माधुरी दबडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते आदि शंकराचार्य यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर डॉ. राजीव दबडे आणि डॉ. माधुरी दबडे यांनी सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांचा सत्कार करून आर्शिवाद घेतला. नंतर डॉ. मेघा कमलापूरकर यांनी सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज यांचा परिचय करून दिला. नंतर वरद श्रीराम आणि वेदांग नाईक या दोन चिमुकल्या मुलांनी श्रीराम भुजंगप्रयात स्तोत्र म्हणून दाखवले त्यानंतर उपस्थितांनी एका सुरात या स्तोत्राचे वाचन केले. नंतर सदगुरू ज्ञानराज माणिकप्रभु यांनी आदि शंकराचार्य यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला रसिक श्रोते तसेच आदि शंकराचार्य भक्तांनी मोठी गर्दी केलेली होती.

Previous Post

भारत निवडणूक आयोगाचे खर्चविषयक निवडणूक निरीक्षक मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात दाखल

Next Post

ड्राय डे च्या दिवशी नोंदविले 29 गुन्हे

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…
आरोग्य

“समर्थ” स्वामीच्या कुटुंबासाठी देवेंद्र “दादा”, महापौर थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; फडणवीस यांनी ताबडतोब…

28 July 2026
Next Post
ड्राय डे च्या दिवशी नोंदविले 29 गुन्हे

ड्राय डे च्या दिवशी नोंदविले 29 गुन्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.