Mahesh Hanme / MH 13news
मराठा आरक्षणासाठी कोट्यावधी मराठे हे रस्त्यावर उतरलेले असून आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. मराठा लॉंग मार्च मुंबईत दाखल झाला असून नवी मुंबईतील वाशी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि असंख्य कार्यकर्ते जमा झालेले आहेत. परंतु,आझाद मैदान कडे जाण्याचे रस्ते बंद असल्याची माहिती गुगल मॅपने दिलेली आहे.
तब्बल सात दिवसापासून पायी दिंडीच्या माध्यमातून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आज 26 जानेवारी रोजी त्यांचा मुक्काम हा वाशीमध्ये आहे. त्यांच्यासोबत असंख्य मराठे बांधव असून ते आझाद मैदानात जाण्याची शक्यता आहे . आझाद मैदानावर सुद्धा अनेक मराठा बांधव ठाण मांडून बसले आहेत. विजयाचा गुलाल इथेच उधळायचा किंवा उपोषण इथेच करायचे असा निर्धार मराठा समाज बांधवांनी केलेला दिसून येत आहे. या ठिकाणी भजनी मंडळाच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान ,गुगल मॅप ने Route Closed No Other Routes Available असा संदेश दिलेला आहे. त्यामुळे इतर वाहनधारकांची कोंडी होऊ शकते.