Mahesh Hanme/ MH 13news
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना झाले. आज 26 जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर तोडगा निघणार का.? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकर आरंगळ
आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे स्वीय सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
शासनाचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आज शनिवारी रात्री मनोज जरांगे पाटील आणि लाखो मराठा समाज बांधव हे वाशी येथे मुक्कामासाठी आहे.
जरांगे पाटील यांनी अद्यापही उपोषण सोडले नाही .आपल्या मागणीवर जरांगे ठाम असून त्यामुळे सरकारला घाम फुटलेला आहे .मुख्यमंत्र्यांनी शांतता आणि सुव्यवस्था राखावी असे सांगितले असून प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती प्रसार माध्यमांना देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी दिली होती तर उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी चर्चेतून निश्चितच मार्ग निघेल असा आशावाद वर्तवला होता.
सरकारने आज दुपारी शिष्टमंडळाच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्या अनेक मागण्यांना हिरवा कंदील दिला होता त्यामध्ये शिंदे समितीला वर्षभराची मुदत वाढ द्या या मागणीवर जरांगे पाटील हे ठाम होते तर अंतरावलीसह सर्व आंदोलकांवर केलेले गुन्हे हे मागे घ्यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांना शिक्षणामध्ये शंभर टक्के माफी मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती.
सरकारी भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवाव्या अथवा तोपर्यंत कोणतीही सरकारी भरती करू नये असे त्यांनी दुपारी ठामपणे आंदोलकांसमोर सांगितले होते.
सद्यस्थितीमध्ये नवी मुंबईमध्ये तसेच आझाद मैदान या ठिकाणी लाखो मराठी समाज बांधव ठाण मांडून बसले आहेत. उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी वेळ दिला असून त्यानंतर ते आझाद मैदान या ठिकाणी जाणार आहेत.
शिष्टमंडळामध्ये कोणताही मंत्री नसून शासकीय अधिकारी आहेत. या शिष्टमंडळाची झालेल्या चर्चेत आता नेमके काय होणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.