Tuesday, January 20, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन पॅकेज

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रकल्पग्रस्तांना पूनर्वसन पॅकेज
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

२३ लाभार्थ्यांना २ कोटी ७३ लाखांचे धनादेश वाटप

चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या खुल्या कोळसा खाणीमुळे बरांज मोकासा, चेक बरांज, तांडा आणि पिपरबोडी गावांचा गत 15 वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निकाली निघाला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले आहे. या अंतर्गत शुक्रवारी नियोजन भवन येथे 23 लाभार्थ्यांना 2 कोटी 73 लाखांचे धनादेश वाटप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, महानगर पालिका आयुक्त विपीन पालीवाल, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार (भुसंपादन), अतुल जटाळे (पुनर्वसन), डॉ. मंगेश गुलवाडे, देवराव भोंगळे, नरेंद्र जीवतोडे, रमेश राजुरकर, बरांज मोकासाच्या सरपंचा मनिषा ठेंगणे, प्रवीण ठेंगणे आदी उपस्थित होते.

कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही कोळखा खाण सन 2015 ते 2021 या कालावधीत बंद होती. खाण सुरू झाल्यानंतर कंपनीने प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला दिला नाही. प्रकल्पग्रस्त कुटुंबांना बंद काळातील पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. या संदर्भात त्यांनी थेट केंद्रीय कोळखा मंत्री श्री. रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या. अखेर बरांज मोकासा, तांडा आणि चेकबरांज, पिपरबोडी येथील 328 कुटुंबांना 40 कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले.

यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, मी कायम प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्री किशन रेड्डी यांना चंद्रपुरात आणून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येतील. ज्यांना पुनवर्सन पॅकेज अंतर्गत धनादेश मिळाले त्यांनी हे पैसे सुरक्षित ठेवावे. उर्वरीत नागरिकांनासुध्दा धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. कोणीही पुनर्वसन पॅकेजपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीसुध्दा पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

या लाभार्थ्यांना मिळाले पुनर्वसन पॅकेज : बरांज मोकासा येथील श्यामराव बालपाणे, दौलत बालपाणे, सुधाकर बालपाणे, दादाजी निखाडे, ताराबाई पालकर, बबन सालुरकर, एकनाथ तुळनकर, अशोक पुनवटकर, मायाबाई देवगडे, सुशीला डहाके, शंकर काथवटे यांना, चेकबरांज येथील सुर्यभान ढोंगे, सुमन ढोंगे, संजय ढोंगे, लक्ष्मण कोवे, नीळकंठ मेश्राम यांना तर नोकरीच्या ऐवजी एकरकमी मोबदला म्हणून देवराव परचाके, भाऊराव परचाके, विश्वनाथ जिवतोडे, काशिनाथ जिवतोडे, शशिकला चालमुरे, परसराम घाटे, हनुमान भोयर या सर्वांना एकूण 2 कोटी 73 लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री सहायता निधीचे वाटप : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्वाती हर्षल पारखी आणि लता बाळू गेडाम यांना मुख्यमंत्री सहायता निधीचा प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला.

Previous Post

वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ

Related Posts

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”
महाराष्ट्र

नायलॉन मांजा बाळगला तर थेट २.५० लाखांचा दंड! विक्रेत्यांसाठी कडक इशारा”

13 January 2026
मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”
महाराष्ट्र

मतदान आधी, मशीन नंतर! १५ जानेवारीला उद्योग–कारखान्यांना सुट्टीच सुट्टी”

13 January 2026
Next Post
जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ

जर्मन भाषा प्रशिक्षण वर्ग शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.