Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धक्कादायक ! ZP माजी सीईओ प्रकाश वायचळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

MH13 News by MH13 News
2 years ago
in नोकरी, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
351
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO प्रकाश वायचळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळामध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

प्रकाश वायचळ हे औरंगाबाद मध्ये राहत होते, सोलापूर जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर त्यांना काही दिवसानंतर उद्योग विभागाच्या आयुक्तपदी पोस्टिंग मिळाली होती. मागील चार महिन्यांपूर्वीच ते उद्योग विभागाच्या आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. सोलापुरातील झेडपीचे कामकाज सांभाळताना अनेक ठिकाणी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. परंतु संवाद चातुर्याने, स्वभाव गुणामुळे एक उत्तम अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या बदलीनंतर प्रकाश वायचळ यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. एक सक्षम आणि कर्तव्य कठोर अधिकारी आणि तितकाच संवेदनशील प्रशासक अशी त्यांची ओळख संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये होती. जिल्हा परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.

नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी नवे सीईओ म्हणून दिलीप स्वामी हे रुजू झाले होते.

आय ए एस पदोन्नती मध्ये प्रथम क्रमांक नाव असतानाही  अनफिट दाखवून जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना डावलेले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले होते .या अन्यायाविरोधात वायचळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने राज्यातील 23 अधिकाऱ्यांची आयएएस च्या दर्जावर पदोन्नती केली.

कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत एक प्रशासक, कोविड योद्धा म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे  यांनी कामकाज केले होते. पहिल्या लाटेतील त्यांचे काम कौतुकास्पद झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले होते. अशा या अधिकाऱ्याच्या जाण्याने निश्चितच प्रशासनातील चांगला व्यक्ती गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी, पत्रकारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Tags: zp solpaur
Previous Post

बाळे : १५ नगरात चिखलाचे साम्राज्य; भाजपाचे आयुक्तांना निवेदन

Next Post

Solapur: मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी लाखो मराठे एकवटणार.!

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

Solapur: मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी लाखो मराठे एकवटणार.!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.