MH 13 News Network
सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO प्रकाश वायचळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या वर्तुळामध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
प्रकाश वायचळ हे औरंगाबाद मध्ये राहत होते, सोलापूर जिल्हा परिषदेमधून मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली झाल्यानंतर त्यांना काही दिवसानंतर उद्योग विभागाच्या आयुक्तपदी पोस्टिंग मिळाली होती. मागील चार महिन्यांपूर्वीच ते उद्योग विभागाच्या आयुक्त पदावरून निवृत्त झाले होते. सोलापुरातील झेडपीचे कामकाज सांभाळताना अनेक ठिकाणी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. परंतु संवाद चातुर्याने, स्वभाव गुणामुळे एक उत्तम अधिकारी अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या बदलीनंतर प्रकाश वायचळ यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली होती. एक सक्षम आणि कर्तव्य कठोर अधिकारी आणि तितकाच संवेदनशील प्रशासक अशी त्यांची ओळख संपूर्ण जिल्हा परिषदेमध्ये होती. जिल्हा परिषदेच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते.
नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांची बदली झाली आणि त्या ठिकाणी नवे सीईओ म्हणून दिलीप स्वामी हे रुजू झाले होते.
आय ए एस पदोन्नती मध्ये प्रथम क्रमांक नाव असतानाही अनफिट दाखवून जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांना डावलेले असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले होते .या अन्यायाविरोधात वायचळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सप्टेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने राज्यातील 23 अधिकाऱ्यांची आयएएस च्या दर्जावर पदोन्नती केली.
कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत एक प्रशासक, कोविड योद्धा म्हणून त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे यांनी कामकाज केले होते. पहिल्या लाटेतील त्यांचे काम कौतुकास्पद झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला शिस्त लावण्याचे काम त्यांनी केले होते. अशा या अधिकाऱ्याच्या जाण्याने निश्चितच प्रशासनातील चांगला व्यक्ती गमावल्याची खंत व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकारी, पत्रकारांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.