काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंची मराठा आंदोलकांसोबत शाब्दिक वादावादी.. जसं आहे तसं..
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज सोलापूर शहर जिल्ह्यातील सकल मराठा समाज कार्यकर्ते शहरातील तिन्ही आमदारांच्या घरासमोर जमा झाले. यावेळी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याशी फोनवर झालेल्या शाब्दिक वादाची ही ऑडिओ व व्हिडिओ क्लिप .. जसं आहे तसं
भाजपाचे आमदार आणि माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जमा झाले .या ठिकाणी हलगी नाद करण्यात आला. त्याच सोबत आमच्या नेत्याचे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही का प्रयत्न करत नाहीत.? असा सवाल उपस्थित करून येत्या 20 फेब्रुवारीला 50% च्या आत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी तुम्ही नेमका काय प्रयत्न करत आहात.? हा प्रश्न उपस्थित केला.
दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन कॉल वरून बोलावयास भाग पाडले. हा कॉल स्पीकरवर घेऊन सर्व समाज बांधवांना कॉल वरील संभाषण देशमुख यांनी ऐकवले. गृहमंत्र्यांसोबत सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांचेही संभाषण झाले. परंतु अर्धवट बोलून कॉल संपला.
त्यानंतर मराठा समाज बांधव आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर गेले असता त्या काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या मीटिंगसाठी गेल्याची माहिती त्यांच्या स्वीय सहायकाने समाज बांधवांना दिली.
दरम्यान त्यांना कॉल वरून समाजाची व्यथा सांगण्याचा प्रयत्न समाजबांधव करत असताना आमदार शिंदे यांनी केवळ माझ्याच घरासमोर आंदोलन का हा प्रतिप्रश्न केला. त्या नेमके काय बोलल्या..? पहा