MH 13News Network
नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत प्रतिवर्षीप्रमाणे श्री ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळाची मूर्ती स्थापना पडगाजी नगर, अक्कलकोट रोड येथे मोठ्या उत्साहात करण्यात आली. यंदा एका सीमेवरील देशाची सेवा करणारा जवान, तसेच पोलीस दलामध्ये सेवेत असणारी एका महिला भगिनींचे हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
श्री शिव छत्रपतीची मूर्ती स्थापना आणि पूजा जम्मू काश्मीर येथे सीमेवर तैनात असलेले जवान मेजर मेटे व महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवेत असणारे त्यांची पत्नी सौ. मेटे या पती-पत्नीच्या हस्ते तसेच सध्या गुजरात येथे बॉर्डर असणारे मेजर पौळ यांच्या हस्ते, मंडळाचे आधारस्तंभ श्रीकांत घाडगे यांच्या उपस्थितीत कऱण्यात आली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी साळुंखे मामा, नागेश घोरपडे, रवि दिलसिंगे (भावजी ) ,राम मगर LHP कंपनीचे जाधव, अनिल नंदी, गणेश माळी, बबलू घाडगे ,रोहन जाधव, धोडाप्पा तोरणगी, किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे संस्थापक संजय पारवे ,उत्सव अध्यक्ष दत्ता परसे कार्यध्यक्ष भरत कुरणे, उपाध्यक्ष विठ्ठल जगताप, खजिनदार समर्थ सुरवसे ,सचिव सुरज गंधूरे, ज्ञानेश्वर पवार ,तुकाराम पाटील, सोमनाथ पवार, छत्रुगण कुरणे ,माऊली सुरवसे ,अनिल ढेकणे, कार्यकर्ते आणि परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.