MH 13 News Network
आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर येथे सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आजच्या या कार्यक्रमाला शाळेत गेल्यावर शाळेचे रूपडे पाहून खूप आनंद झाला अशी जिल्हा परिषदेची शाळा आपल्या सोलापूर जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात सर्व शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले, त्यात अंबिका नगर येथील जिल्हा परिषद शाळेचा सोलापूर जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोख 11 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
आज या शाळेला यश प्राप्त करून देणारे सर्व शिक्षक स्टाफ व मुख्याध्यापक माशाळे यांचा आनंद भवर मित्रपरिवार व त्या परिसरातील नागरिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाळे भागातील अंबिका नगर या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक माझे वडील तानाजी (दादा) भवर यांच्या हस्ते या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मुहूर्तमेढ रोवली होती.सलग 25 वर्ष माझ्या वडिलांचे हस्ते या शाळेत स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनाचा मान मिळत होता.आज तोच वारसा मला गेल्या 14 वर्षापासून मिळत आहे. याबाबत मला खूप समाधान आणि आनंद मिळत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते आनंद भवर यांनी व्यक्त केली.