MH 13News Network
पाणीदार आमदार अशी ओळख निर्माण झालेले अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विविध विकासकामांचा धडाका लावला आहे. हणमगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. उजनी जलपूजन आणि विविध विकासकामांचे उद्घाटन या कार्यक्रमप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या कामाचे खूप कौतुक केले होते.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील हणमगाव येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून हणमगाव ते वळसंग येथील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

यावेळी सरपंच सौ. अनारकली शेख, श्री. रामप्पा चिवडशेट्टी, श्री. इरफान शेख, श्री. संजय हुमनाबादकर, श्री. संतोष हुमनाबादकर, श्री. संतोष गायकवाड, श्री. महादेव पाटील, श्री. सुनील कळके, श्रीशैल माळी, श्री. महेश बिराजदार, श्री. दगडू मुलगे, श्री. शिवानंद अंदोडगी, श्री. राजेसो चंदू मुल्ला, श्री. चांद हसन शेख, श्री. शिवबसप्पा शिलवंत, श्री. इलही शेख, श्री. पिरसाहेब शेख, श्री. अमीन मुजावर, श्री. दिलीप गवंडी, श्री. निर्वांना शिलवंत, श्री. संजय म्हैत्रे, श्री. रवींद्र म्हैत्रे, श्री. अप्पासाहेब गुरव, श्री. शकील शेख, शांताबाई हुमानाबादकर, पुष्पा गुरव, श्री. सौरभ होनमुटे साहेब आदीसह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
