Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

काम बोलता हैं.! देशमुख यांना उपमुख्यमंत्र्यांची साथ ; कामगारांना मिळणार हक्काची घरे..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in आरोग्य, महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
काम बोलता हैं.! देशमुख यांना उपमुख्यमंत्र्यांची साथ ; कामगारांना मिळणार हक्काची घरे..!
0
SHARES
281
VIEWS
ShareShareShare

६७५ कामगारांना डिसेंबरमध्ये मिळणार घराच्या चाव्या : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

मुलभूत सोयी सुविधांसाठी उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांनी आभार मानले

प्रधानमंत्री आवास योजनेतून सोलापूर शहरातील असंघटित क्षेत्रातील तब्बल १२०० कामगारांना राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेतर्फे हक्काची घरे मिळण्यासाठीची सोडत प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. २०० सदनिकांसाठी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते संगणकीकृत पद्धतीने सोडत काढण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव राजेंद्र काटवे, माजी सभागृह नेते संजय कोळी, एमएसईडीसीएलचे कार्यकारी अभियंता रमेश राठोड, महारूद्र हावळे, सोलापूर महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता तपन डंके, प्रसाद कुलकर्णी, प्रधानमंत्री आवास योजनेचे नागनाथ पदमगोंडा, सिद्धाराम मेनकुदळे, एमएसईबीचे अधिकारी मुल्ला, अमोल काटकर, राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, सचिव अण्णाराव कानडे उपस्थित होते.यावेळी संगणकीकृत पद्धतीने सोडत काढून २०० जणांची निवड करण्यात आली.

तसेच या गृहनिर्माण प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या ५० कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाणी, अंतर्गत विद्युत व्यवस्थापैकी विकासकामांचे उद्घाटनही आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून सोडत काढण्यात आली.याप्रसंगी आ. विजयकुमार देशमुख म्हणाले, स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.

दहिटणे येथील ७० एकर परिसरात एकूण ५ हजार घरे उभारण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील १२०० घरे बांधून पूर्ण झाली आहेत. त्यातील ६७५ लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्यात घरांच्या चाव्या मिळणार आहेत. उर्वरित घरे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा मानस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून असंघटित कामगार, बांधकाम कामगार, भाजीविक्रेते यांच्यासाठी ही घरे उभारण्यात आली आहेत.

केवळ ७५ हजार रुपयांपासून ३ लाख ७१ हजार रुपयांपर्यंत कामगारांना घरे मिळत आहेत. सोलापूरच्या जनतेने सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या सरकारच्या पाठीशी उभे रहावे. महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.राजेश दिड्डी यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्वेता हुल्ले यांनी केले.

Tags: BJP MaharashtraDevendra fadanvisMLA vijaykumar deshmukh
Previous Post

राज्यपाल मंगळवारी सोलापुरात ; असा आहे दौरा..

Next Post

सोलापूरवर ‘भाईं’चे प्रेम ; विशेष निधीतून विकासकामाचे धडाक्यात उद्घाटन

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
सोलापूरवर ‘भाईं’चे प्रेम ; विशेष निधीतून विकासकामाचे धडाक्यात उद्घाटन

सोलापूरवर 'भाईं'चे प्रेम ; विशेष निधीतून विकासकामाचे धडाक्यात उद्घाटन

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.