MH 13 News Network
विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. अनेक जणांनी शड्डू ठोकून मी आमदार होणारच याची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघात यंदा मोची समाजाचाच आमदार होणार असे डिजिटल बोर्ड झळकले असून त्यावर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री म्हणून खासदार प्रणिती शिंदे यांचे पोस्टर लागले आहे. याचीच चर्चा सध्या शहर परिसरात घडत आहे.

माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे आणि बाबा ग्रुप सोलापूर यांच्या वतीने हे डिजिटल एम्प्लॉयमेंट चौकात लावले आहे. यावर मोची समाजाची सुपुत्र शहर मध्य भावी आमदार अंबादास (बाबा) करगुळे यांचे मोठे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे.
दरम्यान, मोची समाजाची बैठक घेऊन अंबादास करगुळे यांनी शहर मध्य मधून मोची समाजाला विधानसभा उमेदवारीची संधी मिळावी अशी मागणी काँग्रेसकडे केली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अंबादास करगुळे यांनी पक्षासाठी अनेक आंदोलने उभी केली होती. एक आक्रमक तरुण चेहरा म्हणून करगुळे यांची ओळख आहे. मोची समाजाच्या वतीने करगुळे यांचे नाव पुढे आले आहे.
याच पार्श्वभूमीवर काल सोमवारी रात्री डिजिटल बोर्ड झळकल्याने शहर परिसरात, आणि काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत.
यंदा आमचेच सरकार येणार..!
मोची समाजाची बैठक घेण्यात आली होती. त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमचा समाज मोठ्या संख्येने आहे. आजपर्यंत काँग्रेस पक्षासाठी आम्ही एकनिष्ठ राहिलो आहोत. समाजाच्या योगदानामुळे आमदार, खासदार निवडून आले. यंदा समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला संधी मिळाली पाहिजे. यासंदर्भात इच्छुक असल्याची माहिती आणि अर्ज मी पक्षांच्या प्रमुखांकडे दिले आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या विषयी आदर असल्यामुळे त्याच राज्याच्या मुख्यमंत्री बनतील असा विश्वास मला वाटतो. यंदा आमचेच सरकार येणार. अंबादास (बाबा) करगुळे ,
काँग्रेस युवा नेता
महत्वाची अपडेट..
आज निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद असून आज दुपारपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या पत्रकार परिषदेकडे लागून राहिले आहे.