MH 13 News Network
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार महेश (आण्णा) कोठे यांच्या प्रचारार्थ उद्या सोमवारी ( 4 नोव्हेंबर) रोजी पदयात्रेस सुरुवात होणार आहे. पदयात्रेची जय्यत तयारी महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यंदाच्या निवडणुकीत माजी महापौर महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
राजकारणाचा दांडगा अभ्यास, शहराच्या राजकारणातील मुरब्बी नेते तात्या कोठे यांचे वारस असणारे महेश कोठे संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल रॅलीत केलेल्या शक्ती प्रदर्शनामुळे संपूर्ण मतदारसंघात मोठ्या चर्चेला उधाण आले होते. जवळपास पाच ते साडेपाच तास चाललेल्या पदयात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळाला तर हजारो कार्यकर्ते, समर्थक, पदाधिकारी कोठेंच्या रॅलीत सहभागी झाले होते.
पदयात्रेपासूनच महेश कोठे यांनी भेटीगाठींचा सिलसिला सुरू ठेवला आहे. जुने संबंध पुन्हा ऍक्टिव्ह मोड मध्ये आणण्यात त्यांना यश मिळाले आहे.
उद्या सोमवारी सकाळी पदयात्रेस सुरुवात होणार असून या रॅलीत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उत्तरचे उमेदवार महेश कोठे यांनी केले आहे.
असा आहे पदयात्रेचा मार्ग..
प्रभाग क्रमांक 10 मध्ये सकाळी साधारण आठ नंतर पदयात्रेस सुरुवात होईल. गोंधळी वस्ती, राजेश कोठे नगर, जुना रंगराज नगर, बी ग्रुप, महेश नगर, अ ग्रुप, डी वन ग्रुप, सी ग्रुप, सी वन ग्रुप,मार्कंडेय वसाहत ,श्रीकृष्ण वसाहत ,एफ वन ग्रुप, डी 2 ग्रुप, जी ग्रुप, ई ग्रुप, एच ग्रुप ,प्रियदर्शनी नगर, तुळशांती नगर ते सग्गम नगर असा पदयात्रेचा मार्ग असल्याची माहिती देण्यात आली आहे.