MH 13 News Network
मराठा समाजाची राजकारणात येण्याची इच्छा नव्हती. पण या राजकारण्यांनी ही वेळ आणली. राजकीय भूमिका घेण्याशिवाय समोर दुसरा पर्यायही नाही- गरजवंतांचे काही प्रतिनिधी निर्णय प्रक्रियेत असावेत म्हणून काही जागा लढवणार असल्याचे अंतरवाली सराटीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायासमोर स्पष्ट केले.
मराठा मुस्लिम बौद्ध असे समीकरण केल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. मराठ्यांना कोणी हिंदुत्व शिकवू नये. आम्हाला शिवरायांचे हिंदुत्व मान्य आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
लढणार की पडणार यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून अनेक आमदार, मंत्री ,माजी मंत्री ,मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी तासंनतास वाट पाहत आहेत. काल अंतरवाली सराटी मध्ये हजारो गाड्यांची गर्दी झाली होती. त्यातून शेकडो इच्छुक उमेदवार जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते.
आज सकाळी उमेदवारांचे नाव फायनल होण्याची शक्यता आहे. सलग तेरा तास बैठक सुरू असून काल रविवारी रात्रभर बैठक सुरू होती. काही मतदारसंघात बदल होऊ शकतो.
सलग १३ तास बैठक सुरु आहे, आज रात्रभर बैठक घेऊन उमेदवारांची नावे फायनल करणार-
ज्या मतदारसंघाचे नाव सकाळपर्यंत येणार नाही, त्या बांधवांनी उद्या अर्ज मागे घ्यावेत असे म्हणून जरांगे पाटील यांनी सांगितले आहे.
हा निर्णय वैयक्तिक कोणासाठी नसून जातीला समोर ठेऊन घेतला आहे.
कारण जात हरली तर आपण पाहू शकणार नाही
मतदारसंघ व मराठ्यांची भूमिका
बीड – लढवणार केज(राखीव)- लढवणार मंठा, परतूर – लढवणार फुलंब्री – लढवणार कन्नड – लढवणार (चर्चा सुरु)
वसमत – लढवणार (चर्चा सुरु)हिंगोली – लढवणार (चर्चा सुरु)पाथरी, परभणी – लढवणार गंगाखेड – लढवणार (चर्चा सुरु)
हदगाव (नांदेड) – लढवणार लोहा कंधार,
नांदेड – चर्चा सुरु धाराशिव, कळंब – लढवणार
तुळजापूर – चर्चा सुरु भूम, परांडा – लढवणार
दौड, पुणे – लढवणार
पर्वती, पुणे – लढवणार
पाथर्डी – लढवणार
कोपरगाव – लढवणार
नेवासा – चर्चा सुरु
पाचोरा – लढवणार (चर्चा सुरु)करमाळा – लढवणार
माढा – लढवणार (चर्चा सुरु)
धुळे शहर – लढवणार (चर्चा सुरु)निफाड – लढवणार (चर्चा सुरु)
नांदगाव – लढवणार (चर्चा सुरु)पुढील अपडेट लवकरच..
हा निर्णय जाहीर करताना मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यांत अश्रू आले. तेव्हा उपस्थित असलेल्या असंख्य मराठा समाज बांधवांनी डोळ्यातील अश्रूंच्या एकेक थेंबांचा हिशोब घेऊ अशी भावना व्यक्त केली.