Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शहर मध्यचा आमदार यंदा भाजप महायुतीचा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
शहर मध्यचा आमदार यंदा भाजप महायुतीचा
0
SHARES
2
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे : शहर मध्य चा निर्धार मेळावा उत्साहात

सोलापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी महायुतीला सोलापुरात मतदार बंधू-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शहर मध्य विधानसभेचा आमदार यंदा भाजपा महायुतीचाच असेल असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी केले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी उपलप मंगल कार्यालयात शहर मध्य विधानसभा युवा मोर्चावतीने निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर भाजयुमो प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, वृषाली चालुक्य, अक्षय अंजिखाने, अनिकेत हारपुडे, सागर कोटला, विश्वनाथ प्याटी, रोहन मराठे, गणेश साखरे, विजय कुलथे, शिवा कावडे, सुनील साळुंखे, बसवराज गंदगे, शिवा कामाठी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मध्य पूर्व व पश्चिम मंडलाची कार्यकारिणी घोषित करून नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. युवा नेते व वडार समाजाचे युवक अध्यक्ष सुनील साळुंखे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत देवेंद्र कोठे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प जाहीर केला.

श्री. मोरे म्हणाले, युवा मोर्चाच्यावतीने राज्यभरात प्रवास करताना अनेक मेळावे केले. मात्र शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जो मेळावा होत आहे या मेळाव्यातील युवकांची गर्दी व उत्साह पाहता देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित असून फक्त लीड किती याचीच आतुरता आम्हाला लागली आहे. त्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या मताधिक्यासाठी प्रयत्न करावेत, असेही श्री. मोरे याप्रसंगी म्हणाले. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची मूर्ती देऊन याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी मंडलाच्या कार्याची माहिती प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांना दिली. तसेच मंडलात आगामी कार्यक्रमाच्या माध्यमातून नवमतदारांपर्यंत पोहचून महायुती सरकारने केलेली कामे सांगणार असल्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी केले. याप्रसंगी ते म्हणाले, युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता देवेंद्र कोठे यांना आमदार करण्यासाठी तत्पर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपला मध्य विधानसभा जागा देऊन जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवू असेही श्री. अंजिखाने याप्रसंगी म्हणाले.

कार्यक्रमाचे आभार युवा मोर्चाचे मंडल अध्यक्ष विश्वनाथ प्याटी व रोहन मराठे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ओंकार होमकर, अनिल अंजनालकर, अनिल वंगारी, उदयराज गुल्लापल्ली यांच्या शहर मध्य विधानसभेतील युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा उत्साहात

Next Post

महायुती सत्येत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २१०० रुपये

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
महायुती सत्येत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २१०० रुपये

महायुती सत्येत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २१०० रुपये

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.