Thursday, October 29, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

महायुती सत्येत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २१०० रुपये

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
महायुती सत्येत आल्यास लाडक्या बहिणींना मिळणार दरमहा २१०० रुपये
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

भाजपा महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ : देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस उदंड प्रतिसाद

सोलापूर : प्रतिनिधी
महिलांना सशक्त आणि सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने केले आहे. महायुती सत्येत आल्यास महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (ए) गट महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सुनिल नगर परिसरात प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस महिलांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

प्रारंभी भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मोठ्या संख्येने जमलेल्या लाडक्या बहिणींना, महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस इंदिरा कुडक्याल, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रंजीता चाकोते, प्रदेश चिटणीस अर्चना वडनाल, प्रदेश कार्यकारणी सदस्य शोभा नष्टे, माजी नगरसेविका राधिका पोसा, विजयलक्ष्मी गड्डम, सोशल मीडिया मध्य विधानसभा महिला प्रमुख अंजली वलसा, शहर चिटणीस सावित्री पल्लाटी, चिटणीस संगीता खंदारे, मोनिका कोठे, जैन प्रकोष्ठ प्रमुख साधना संगवे, महिला मंडल अध्यक्षा लक्ष्मी बदलापुरे, राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, अर्चना बोमड्याल उपस्थित होते.

वाघ म्हणाल्या, ज्या महिलांना अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत अशा सर्व महिलांना निवडणूक संपल्यानंतर मागील चारही महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार आहेत. महिला भगिनींना योजनेचे पैसे मिळू नयेत याकरिता काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे न्यायालयात गेले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही महिला विरोधी भूमिका मतदान करताना महिलांनी आणि पुरुषांनीही ध्यानात घ्यावी, असे आवाहनही वाघ यांनी यावेळी केले.

महायुतीचे सरकार आले तर लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत. उलट नियमित आणि वाढवून मिळतील याची खात्री महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाला आहे. काँग्रेसने महिलांची मते घेतली. परंतु महिलांसाठी काहीही केले नाही. काँग्रेसने जनतेचीच काय तर काँग्रेसच्या आणि इतर सहकारी पक्षाच्या नेत्यांचीही फसवणूक केल्याचे सोलापुरात दिसून येत आहे. केसाने गळा कापणाऱ्या काँग्रेसकडे न जाता मतदार बंधू-भगिनींनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करणाऱ्या भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी याप्रसंगी केले.

उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, सुनील नगर आणि परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद पदयात्रा, प्रचार फेरी, होम टू होम प्रचार अभियानाला मिळत आहे. त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचा विजय निश्चित आहे.

या पदयात्रेत भाजपाचे शेले, टोप्या परिधान करून यावेळी शेकडो कामगार बांधव, सुनील नगर आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेवक डॉ. राजेश अनगिरे, काशिनाथ झाडबुके, भाजपा शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, माजी नगरसेविका राधिका पोसा, शहर चिटणीस सुनील गौडगाव, विधानसभा पदयात्रा प्रमुख दत्तात्रय पोसा, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, ओबीसी मोर्चाचे मंडल अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार, सिद्धाराम खजुरगी, मंडल उपाध्यक्ष भीमाशंकर जावळे, सुनिता कामाठी, सोशल मीडिया शहर संयोजक अभिषेक चिंता, शहर मध्य विधानसभा सोशल मीडिया संयोजक अंबादास सकिनाल, विधानसभा सहसंयोजक भास्कर बोगम, डॉ. राजेंद्रप्रसाद गाजुल आदी सहभागी झाले होते.

Previous Post

शहर मध्यचा आमदार यंदा भाजप महायुतीचा

Next Post

सासऱ्यांसाठी सुनबाई डॉ. उर्वशी ताई देशमुख निवडणुकीच्या प्रचारात…

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

23 October 2026
मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post
सासऱ्यांसाठी सुनबाई डॉ. उर्वशी ताई देशमुख निवडणुकीच्या प्रचारात…

सासऱ्यांसाठी सुनबाई डॉ. उर्वशी ताई देशमुख निवडणुकीच्या प्रचारात…

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.