MH 13News Network
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा
सोलापूर, दि.04 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळमार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दि.11 मार्चपर्यंत सादर करावा, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच.चव्हाण यांनी केले आहे.
मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील कुटुंबांचे सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी, त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधणे उपलब्ध व्हावीत त्यांना सर्वसामान्यांचा विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महामंडळाने नाविण्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी नाविण्यपूर्ण एनएसएफडीसी योजनेंतर्गत लाभ दिला जातो.
यामध्ये सुविधा कर्ज योजना(कर्ज मर्यादा 5 लाख रुपये), लघु ऋण वित्त योजना (कर्ज मर्यादा 1.40 लाख रुपये), महिला समृध्दी योजना(कर्ज मर्यादा 1 लक्ष 40 हजार), शैक्षणिक कर्ज योजना (शिक्षणासाठी देशात 30 लाख, परदेशात 40 लाख), या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी वेबसाईटवर https://beta.slasdc/org ऑनलाईन अर्ज सादर करावा.
इच्छुक मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील गरजू व होतकरु नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटवर https://beta.slasdc/org ऑनलाईन अर्ज सादर करावा असे आवाहनही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.चव्हाण यांनी केले आहे.