MH 13News Network
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आई गाळते ‘चहाच्या गाळणी’ तून ‘आयुष्य’ या शीर्षकाखाली सोलापुरातील मुक्त कवी, लेखक पत्रकार असणारे मुन्ना सय्यद यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने महिला दिनाच्या शुभेच्छा अश्विनीताई आणि समस्त कष्टकरी महिला वर्गांना दिलेल्या आहेत.
जसं आहे तसं..
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करताना उजव्या बाजूला सुभाष फुलारी यांची चहा कॅन्टीन आहे. त्या कॅन्टीनमध्ये सुभाष रावांना त्यांच्या सुविद्य पत्नी अश्विनी फुलारी यांचा अखंडित कायम मदतीचा हात असतो.
अश्विनी फुलारी यांचे शिक्षण अवघे नववीपर्यंत झाले आहे. तर सुभाष फुलारी यांचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे. अश्विनी व सुभाष या पती-पत्नीच्या छोट्याशा व्यवसायावर त्यांची मुलं स्वप्नील व साक्षी हे उच्च शिक्षण घेत आहेत. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सय्यद यांनी अश्विनीताई यांची भेट घेऊन अगत्यपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि चौकशी केली तेव्हा त्या म्हणाल्या की…
‘भाईजी आम्हा दोघांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. घरचं करून मी माझ्या जोडीदाराला कॅन्टीनवर मुलं उच्चशिक्षित व्हावी यासाठी मदत करत असते. पुढे ही करीत राहीन..
ताई, तुला महिला दिनाच्या काव्यमय शुभेच्छा..
मुलांच्या प्रगतीसाठी ‘चहाच्या गाळणी’तून ‘आयुष्य’ गाळणाऱ्या ‘आई’ चे हे शब्द प्रगतीचे प्रतीक ‘अशोक चक्रा’ सारखे वाटतात.
कष्टातून सूर्य साकारण्याची हिंमत ठेवणाऱ्या माझ्या भगिनी अश्विनी फुलारी यांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…
मुन्ना सय्यद,पत्रकार,कवी,मुक्त लेखक
सोलापूर