Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मालकांची साथ : सर्वमान्य उमेदवार असलेल्या काडादी यांना विजयी करा – दिलीप माने

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
मालकांची साथ : सर्वमान्य उमेदवार असलेल्या काडादी यांना विजयी करा – दिलीप माने
0
SHARES
298
VIEWS
ShareShareShare

MH13 NEWS NETWORK

धर्मराज काडादी यांना सगळ्यांच्या सहमतीने आणि मोठ्या विश्वासाने आपण निवडणुकीत उभे केले आहे. काडादी हे महाविकास आघाडीचे सर्वमान्य उमेदवार आहेत. काडादी यांच्यासाठी मी माघार घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. आपल्याला नको असलेला उमेदवार बोकांडी बसू नये म्हणून मीच उमेदवार असल्याचे समजून काडादी यांना विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले.
बुधवारी, सोलापूर दक्षिण मतदारसंघातील प्रमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघात येणार्‍या उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर, डोणगाव, तेलगाव सीना, पाथरी, बेलाटी, कवठे, तिर्‍हे, शिवणी, पाकणी आदी गावांचा झंझावाती दौरा करून मतदारांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दिलीपराव माने, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा दूध संघाचे संचालक तथा जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष भारत जाधव, कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार कोळी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शालिवाहन माने, माजी सरपंच जैनुद्दिन हुसेन शेख, जयानंद पाटील, माजी उपसरपंच भीमराव वाघमारे, गौडा पाटील, माजी सरपंच एकनाथ ढवळे, चंद्रकांत पाटील, अब्बास मुजावर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


सोलापूर दक्षिण मतदारसंघात येणार्‍या उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांच्या दौर्‍यात मतदारांशी संवाद साधताना माने यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली. मधल्या काळात झालेल्या घडामोडींवरही त्यांनी भाष्य केले. सत्ताधार्‍यांची मुजोरी मोडीत काढणे हे माझे आणि काडादी आम्हा दोघांचे लक्ष्य एकच आहे. जागा कोणत्या पक्षाला सुटली हे आता महत्त्वाचे राहिले नाही. सोलापूर दक्षिणची ही जागा काल काँग्रेसची होती आणि आजही काँग्रेसचीच आहे. पुढेही काँग्रेसचीच राहणार असल्याचा विश्वास माने यांनी व्यक्त केला. त्यामुळे काडादी यांच्या विजयासाठी सर्वांनी कटिबद्ध होणे आवश्यक असल्याचेही माने यांनी सांगितले.
काडादी यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आणि विकासप्रिय नेतृत्वाची गरज असल्याचे सांगत माने म्हणाले, सत्ताधारी आमदारांनी मतदारसंघात विकासकामे न करता आकसबुध्दीने काम केले. केवळ सुडाचे राजकारण करून गावागावात भांडणे लावायचे काम केले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील गावांना नेहमीच दुय्यम वागणूक दिली. सोलापूरच्या आसपास असलेल्या या गावांना जोडणारे रस्ते नीट नाहीत. पाच ते आठ किमी अंतरावरील गावांना सोलापूरला येण्यासाठी अर्धा तास लागतो. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून आपल्यावर अन्याय करणारे निवडून आल्यास पुन्हा पाच वर्षे त्यांची मुजोरी सहन करावी लागणार असल्याचे प्रतिपादन माने यांनी केले.
कै. ब्रह्मदेवदादा माने आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी खांद्याला खांदा लावून या परिसराच्या विकासासाठी काम केले आहे. ही आठवण सांगून माने म्हणाले, धर्मराज काडादी हे सर्वमान्य आणि सर्वसमावेशक उमेदवार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या मानगुटीवर बसलेल्या भाजपचा पराभव करणे हेच आपले लक्ष्य आहे. यावेळी हाताच्या चिन्हाच्या बदल्यात कॉम्प्युटर आहे. हे प्रत्येक घरापर्यंत सांगावं लागणार असल्याचे आवाहन माने यांनी केले.
या दौर्‍यात पाथरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काडादी, माने आणि सहकार्‍यांनी अभिवादन केले. नंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. सोसायटी चेअरमन उद्धव बंडगर यांनी गावकर्‍यांच्यावतीने काडादी, माने यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. बेलाटी येथे ग्रामदैवत महादेव मंदिरात सर्वांनी श्रींचे दर्शन घेतले. कवठे येथे ग्रामपंचायतीसमोरील मैदानात झालेल्या बैठकीत मारुती अंजनवारे, तंटामुक्त अध्यक्ष बाजीराव नरोटे, भीमा पवार, बबन जगताप, माजी सरपंच चंद्रसेन भोसले यांच्यासह गावकरी मो÷ठ्या संख्येने उपस्थित होते. पाकणी येथे ग्रामदैवत नरसिंह मंदिरात काडादी यांनी श्रींचे दर्शन घेतले. सचिन ढेपे, रविंद्र शिंदे, औदुंबर साठे, सुभाष शिंदे, राजकुमार ढेपे, गणेश शिंदे, ज्ञानोबा साखरे, पांडुरंग बेलभंडारे यांच्यासह ग्रमापंचायतचे पदाधिकारी, सिध्देश्वर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातून निघालेल्या पदयात्रेत पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सर्वांना सोबत घेऊन काम करणार- काडादी

सहकारमंत्रिपद मिळाल्यानंतर सहकारी संस्थांना बळ देण्याऐवजी त्यांना मोडीत काढण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधीला या निवडणुकीत घरी बसवण्याची गरज आहे. त्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे स्पष्ट करत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिध्देश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी म्हणाले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांच्या सूचनेनुसार आणि जनतेच्या व दक्षिणच्या सर्व काँग्रेस नेत्यांच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. माजी आमदार दिलीपराव माने यांनी स्वत: माघार घेऊन आपल्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. आज आपल्यासोबत ते प्रचार दौर्‍यात आले आहेत. आपण सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या सहकार्याने काम करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी कोणतेही संभ्रम मनात न ठेवता कॉम्प्युटरचे बटण दाबून आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काडादी यांनी केले.
पहिले मशीन अन् 16 व्या क्रमांकाचे बटण

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसचा हात अथवा तुतारी ही चिन्हे नाहीत. परंतु अपक्ष उमेदवार असलेल्या धर्मराज काडादी यांचे निवडणूक चिन्ह ‘कॉम्प्युटर’ आहे. निवडणुकीत दोन मशीन्स वापरल्या जाणार आहेत. पहिल्या मशीनवर सर्वात खाली 16 व्या क्रमांकावर ‘कॉम्प्युटर’ चिन्ह आहे. या ‘कॉम्प्युटर’चे बटण दाबून काडादी यांना विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले.

Previous Post

आमचं ठरलंय, चेतनभाऊ तुम्हालाच निवडून द्यायचं!

Next Post

‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांची प्रचारात आघाडी..

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांची प्रचारात आघाडी..

'वंचित'चे उमेदवार संतोष पवार यांची प्रचारात आघाडी..

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.