Tuesday, June 17, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकमंगल विवाह सोहळा रविवारी : आ. सुभाष देशमुख

MH13 News by MH13 News
14 December 2024
in राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
लोकमंगल विवाह सोहळा रविवारी : आ. सुभाष देशमुख
0
SHARES
120
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर (प्रतिनिधी)

दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्यावतीने आयोजित सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार दि. 15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.30 वाजता गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. हा फौंडशनतर्फे होणारा 43 वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यात 37 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत, अशी माहिती लोकमंगल फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.


विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक, लोकमंगल नागरी पतसंस्था, लोकमंगल मल्टीस्टेट, आदी एकूण 125 पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यात शहर आणि जिल्हातील 37 जोडप्यांनी नोंदणी केली आहॆ. सर्व विवाह हिंदू पद्धतीने होणार आहे.


या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू-वरास विवाहाचे कपडे, हळदीचे कपडे, वर्हााडी मंडळीच्या भोजनाची सोय, मानाचा आहेर, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत. ताट, वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, स्टील हंडा, स्टील डबा, तांब्या आदी संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. वधू- वरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूकही काढण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार आहेत.

या विवाह समारंभात सर्व वधू-वरांकडील हजारो वर्हाेडींना भोजनाची सोय करण्यात आली आहे. समारंभासाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर 250 बाय 200 फूट आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येणार आहे. जेवणाची व्यवस्था 90 बाय 150 फूट आकाराच्या मंडपात करण्यात आली आहे. याशिवाय दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले आहे.

याचवेळी नवविवाहित जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत सूचना देणारा समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित आला आहे,असे आमदार देशमुख यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला शशी थोरात, सोमनाथ केंगनाळकर , मारुती तोडकर, हरिभाऊ चौगुले, माणिक नरोटे, अभय पटणे आदी उपस्थिती होते.
चौकट

आतापर्यंत 3089 जोडपी विवाहबद्ध

फौंडशनतर्फे होणारा 43 वा सामुदायिक विवाह सोहळा आहे. आतापर्यंत 3089 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यामध्ये हिंदू 2382, बौद्ध 676, मुस्लिम 20, जैन 7 तर ख्रिश्‍चन समाजाचे 7 विवाह झाले आहेत.
चौकट

सोहळ्यामध्ये जपणार सामाजिक भान

उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या आरोग्यासाठी तातडीची वैद्यकीय सेवा उपलब्ध असेल. ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी रक्तदान शिबिराचे स्वतंत्र दालन केले जाणार आहे. मनोरंजनासाठी सामाजिक प्रबोधन करणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. वधू- वरांचे भावी जीवन समाधानकारक व सुखी व्हावे यासाठी मान्यवर समुपदेशक व डॉक्टरांच्या मार्फत समुपदेशनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना सरकारी कन्यादान योजनेंअंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लोकमंगल फाउंडेशन कडून विशेष प्रयत्न करण्यात येतील.
चौकट

लोकमंगलचा मदतीचा हात

समाजामधील स्त्री भ्रूणहत्या, आत्महत्या रोखण्यासाठी लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यास प्रथम मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे 2 हजार रूपयांची ठेव लोकमंगल फाउंडेशन व त्या मुलीच्या नावाने संयुक्त खात्यामध्ये 18 वर्षे मुदतीसाठी ठेवण्यात आलेले आहे. आजपर्यंत अशा समुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यांच्या 240 पेक्षा जास्त मुलींच्या नावे ठेव ठेवण्यात आलेली आहे. लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह झालेल्या जोडप्यास त्यांच्या योग्यतेप्रमाणे लोकमंगल परिवारात नोकरी दिली जाते. आजपर्यंत अशा 185 जावयांना रोजगार देण्यात आला आहे याच बरोबर वधू-वरास कोणता व्यवसाय करावयाचा असेल तर विशेष बाब म्हणून कर्ज देखील मिळवून दिले जाते.

Tags: BJP MaharashtraLokmangalsolapurSolapur Maharashtraलोकमंगल विवाह सोहळा
Previous Post

खासदार प्रणिती शिंदे यांनी घेतली जे.पी. नड्डा यांची भेट..!

Next Post

स्वामी भक्तांच्या सेवेर्थ गोवा- अक्कलकोट – गोवा बस सेवा सुरू

Related Posts

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!
आरोग्य

रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!

14 June 2025
एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार
महाराष्ट्र

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

14 June 2025
पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन
महाराष्ट्र

पुणे पोलिसांच्या स्मार्ट वाहतूक व्यवस्थेस चालना, ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’चे उद्घाटन

14 June 2025
पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट
धार्मिक

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुविधा त्वरित पूर्ण करा – प्रशासनाला अलर्ट

14 June 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे विभागातील कोविड-१९ परिस्थितीचा आढावा

14 June 2025
Next Post
स्वामी भक्तांच्या सेवेर्थ गोवा- अक्कलकोट – गोवा बस सेवा सुरू

स्वामी भक्तांच्या सेवेर्थ गोवा- अक्कलकोट - गोवा बस सेवा सुरू

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.