Sunday, August 16, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

स्वामी भक्तांच्या सेवेर्थ गोवा- अक्कलकोट – गोवा बस सेवा सुरू

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
स्वामी भक्तांच्या सेवेर्थ गोवा- अक्कलकोट – गोवा बस सेवा सुरू
0
SHARES
31
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते बसचे पूजन

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नेतृत्वाखाली भक्तांच्या मागणीनुसार विविध उपाय योजना न्यास करीत असते, याचाच एक भाग म्हणून गोवा राज्यासह सिंधुदुर्ग- कोकण येथील स्वामी भक्तांच्या सेवेर्थ न्यासाकडून पाठपुरावा केल्याने थेट वास्को ते अक्कलकोट ही गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टची बस सेवा काल पासून दि. १२ डिसेंबर पासून सुरु झाल्याने स्वामिभक्तातून समाधान व्यक्त होत आहे.

सदर बस ही वास्को वरून दररोज सायंकाळी ७ वा. सुटणारी बस ही श्री क्षेत्र अक्कलकोटला दुसऱ्यादिवशी सकाळी ७.३० वा. आणि अक्कलकोटहून सायंकाळी ६.१५ वा. सुटणार बस ही वास्कोला दुसऱ्यादिवशी सकाळी ७.३० वा. पोहोचणार आहे. ही बस पणजी, पत्रादेवी, बांधा, म्हापसा, कुडाळ, कणकवली, सांगली, मिरज, कोल्हापूर, पंढरपूर मार्गे सोलापूर अक्कलकोटला पोहोचणार असून बसचे तिकीट दर ८८०/- रुपये असून आरामदाई बसण्याची व्यवस्था असल्यामुळे या बस सेवेमुळे स्वामिभक्तातून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान अक्कलकोट ते वास्को ही गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्ट बसचे पूजन अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

सदरची बस सुरु करण्यासाठी स्वामी भक्त गोवा राज्याचे मुख्यमंत्री ना.प्रमोद सावंत, परिवहन मंत्री मोहीन बुदीनो, गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष उल्हास तुयेकर यांच्याकडे न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, श्रीक्षेत्र अक्कलकोटचे सुपुत्र गोवास्थित अमोल कालिदास कोळी, निलेश पेडणेकर यांनी सदर बस सुरु करण्याकरिता वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

बस पूजना प्रसंगी गोवा राज्य परिवहन महामंडळ, (कदंबा) ट्रान्सपोर्टचे सहाय्यक वाहतूक अधिकारी सुहेश सावंत, चालक मल्लिकार्जुन शिंदे, महेंद्र हजेरी, वाहक रफिक पटेल यांच्यासह न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी महामंडळाचे अधिकारी, चालक-वाहक यांचा सत्कार न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Previous Post

लोकमंगल विवाह सोहळा रविवारी : आ. सुभाष देशमुख

Next Post

‘मला आवडलेले व्याख्यान’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
‘मला आवडलेले व्याख्यान’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन

'मला आवडलेले व्याख्यान' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.