डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी महेश हणमे, मुकुंद उकरंडे तर सहसचिव पदी विक्रांत कालेकर आणि सहखजिनदार पदी प्रमोद तुपसमुद्रे यांची निवड….
डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशन संघटनेचे बैठक सोमवारी खंदक बगीचा येथे पार पडली. संघटनेचे अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या नेतृत्वात ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पुढील काळातील ध्येयधोरणाबाबतीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. सर्वानुमते संघटनेच्या उपाध्यक्षपदावर महेश हणमे, मुकुंद उकरंडे यांची तर सह सहसचिव पदावर विक्रांत कालेकर,तर
सह खजिनदार पदावर प्रमोद तुपसमुद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल अध्यक्ष विजयकुमार बाबर व संघटनेतील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व संघटनेतील सदस्य आकीब, महेश हणमे यांच्या वाढदिवसानिमित्त अध्यक्ष विजयकुमार बाबर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी अध्यक्ष विजयकुमार बाबर, उपाध्यक्ष रवी ढोबळे, मुकुंद उकरंडे, महेश हणमे, सहसचिव लक्ष्मीकांत शिंदे, विक्रांत कालेकर,धनंजय शिंदे, बालाजी चीटमिल,प्रमोद तुपसमुद्रे, शिवानंद येरटे, रत्नदीप सोनवणे, यासीन शेख,इब्राहिम मुजावर, प्रसाद दिवाणजी, दत्तात्रय बोल्लू, सागर मुडके, प्रशांत हलसंगी, शील रत्न इंगळे, विजय कालेकर, रवी काकडे , सागर ईप्पलपल्ली , दिगंबर ईप्पलपल्ली, शहानवाज शेख
उपस्थिती होती.