MH 13News Network
राष्ट्रवादी सहकार विभागाच्या महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष पदी राजेंद्र हजारे यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी निवड केली. या नुतन निवडी बद्दल राष्ट्रवादी सोलापूर शहरच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
राजेंद्र हजारे हे जनकल्याण मल्टीस्टेटचे संस्थापक असुन त्यांना सहकार क्षेत्रातील चांगला अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादी जिल्हा खजिनदारपदी देखील काम केले आहे. येणाऱ्या काळात राजेंद्र हजारे आपण सहकार क्षेत्रातील संघटन मजबूत करून राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे हात बळकट करण्याच्या सदिच्छा दिल्या.
याप्रसंगी श्रीनिवास कोंङी, राजेश देशमुख ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ,माजी नगरसेवक गणेश पुजारी, अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर शेख, सामाजिक न्याय अध्यक्ष राजू बेळेनौर, शामराव गांगर्ङ, नागेश निंबाळकर, सोमनाथ शिंदे, वैद्यकीय मदत कक्ष बसवराज कोंळी, महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, लताताई ढेरे, प्रिया पवार, कांचन पवार,ज्योती शटगार आदी पदाधिकारी उपस्थित होते.