Sunday, February 15, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला

MH 13 News by MH 13 News
11 months ago
in महाराष्ट्र
0
देशप्रेमाची भावना रुजवणारा महान अभिनेता गमावला
0
SHARES
18
VIEWS
ShareShareShare

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मनोजकुमार यांना श्रद्धांजली

mh 13 news network

मुंबई, दि. ४:- ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीतील एका महान व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती आणि भारतीय समाजजीवन जनमानसावर बिंबवणाऱ्या या अष्टपैलू आणि भारतकुमार हे नाव खऱ्या अर्थाने सार्थकी लावणाऱ्या कलाकाराला मी भावपूर्ण अर्पण करतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून मनोजकुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि ‘मेरे देश की धरती’ सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. त्यांच्या ‘पुरब और पश्चिम’ सारख्या चित्रपटांनी तर जागतिक पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले. ‘रोटी कपडा और मकान’ सारख्या चित्रपटांनी त्यांनी सामाजिक विषयांना हात घातला. उपकार, क्रांती असे अनेक चित्रपट त्यांनी गाजवले. त्यांनी आपल्या प्रत्येक कलाकृतीतून देशप्रेमाची आणि राष्ट्रीयत्वाची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. मनोजकुमार यांनी दिग्दर्शन, पटकथा-गीत लेखन, संकलन या क्षेत्रातही काम केले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना संधी दिली. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कोट्यवधी चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Previous Post

कोळा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश

Next Post

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.