mh 13 news network
प्रभाग ७ मध्ये घराघरांत संवादातून विश्वास निर्माण..
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे अधिकृत उमेदवार सुमित गणपत भोसले यांनी शांत, नियोजनबद्ध आणि परिणामकारक असा प्रचार पॅटर्न अवलंबला असून त्याचा प्रभाव थेट मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत


आहे. गाजावाजा टाळत थेट संवादावर भर देणाऱ्या या प्रचार पद्धतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विरोधकही चकित झाल्याचे चित्र आहे.
“जय सद्गुरू” म्हणत आणि “एकदा संधी द्या, एकदा आशीर्वाद द्या” या साध्या पण प्रभावी शब्दांत सुमित भोसले यांनी होम-टू-होम प्रचाराला गती दिली आहे.

प्रभाग ७ मधील ४० प्लॉट, हिंदू रक्षक मंडळ, चिंच नगर तसेच निराळ्या वस्ती भागांमध्ये त्यांनी नागरिकांच्या घराघरांत जाऊन थेट संवाद साधला.
या प्रचारादरम्यान नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, आपुलकीचे स्वागत आणि विश्वासाची भावना अनुभवायला मिळाली. अनेक नागरिकांनी प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता तसेच नागरी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करत सुमित भोसले यांच्याकडून ठोस आणि नियोजनबद्ध विकासाची अपेक्षा व्यक्त केली.
या शांत पण ठाम प्रचार पद्धतीमुळे प्रभागात राजकीय चर्चेला वेग आला असून, कोणताही गाजावाजा न करता थेट मतदारांच्या मनात पोहोचण्याची सुमित भोसले यांची रणनीती प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. “काम बोला, नाव नको” या भूमिकेतून सुरू असलेला हा प्रचार सध्या प्रभाग ७ मध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

जनतेचा विश्वास हीच खरी ताकद असून, प्रभाग ७ चा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न महापालिकेत प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सुमित भोसले यांनी यावेळी सांगितले.
प्रभाग ७ मधून महाविकास आघाडीने सुमित गणपत भोसले, मनीषा केशव माने आणि शीतल किशोर गादेकर यांना उमेदवारी दिली आहे.


तुतारी वाजवणारा माणूस या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सुमित भोसले यांनी मतदार बंधू-भगिनींना केले आहे.










