MH 13NEWS NETWORK
महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणून महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आता महायुतीने पुढील महिन्यापासून महिलांना 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण तालुक्याला कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे . यामध्ये शहरी भागातही मोठ्या प्रमाणात निधी आला आहॆ. भाजप पक्षाने फक्त आणि फक्त विकास केला आहे. त्यामुळे भाजपला मत म्हणजे विकासाला मत आहे, असे प्रतिपदान दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
आमदार सुभाष देशमुख यांनी शहर हद्दवाढ भागातील कोळी समाज सोसायटी (सैफुल), कल्याण नगर आणि आंबेडकर नगर येथील भागात भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी या भागातील महिलांनी आमदार सुभाष देशमुख यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले.
आमदार देशमुख म्हणाले, सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भूमिगत गटारांसाठी तब्बल 400 कोटींपेक्षा जास्त निधी शहरी भागात आला आहे. याशिवाय महिला हॉस्पिटल ते इंगळगी पर्यंत दुहेरी रस्ता करण्यासाठी 224 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आसरा रेल्वे उड्डाणपुलाचे विस्तारीकरणही लवकरच होणार आहे, यासाठी 28 कोटी रुपये मंजूर आहेत. लवकरच याचे काम सुरू होणार आहे. शहरी भागात आपल्याला अनेक सुधारणा करायच्या आहेत. त्यासाठी महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत आणावे. मी दहा वर्षे आपला सेवक म्हणून काम केले आहे आणि पुढील काळातही सेवक म्हणूनच काम करणार आहे. यावेळी या परिसरातील नागरिकांनी आमदार सुभाष देशमुख यांना मोठे मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले. उपस्थित नागरिकांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्याबद्दल शासनाचे आणि आमदार सुभाष देशमुख यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी आनंद बिराजदार,महेंद्र उंबरजे, महेश देवकर,अमोल उंबरजे,दिपक जमादार, नामदेव पवार, श्रीशैल हिरेमठ, महेश देवकर, विशाल गायकवाड, अमोल गायकवाड, नामदेव पवार, अनिल बनसोडे, शीतल गायकवाड,शशिकला खमीतकर व नागरिक उपस्थित होते.